बांगलादेशातील (Bangladesh) एका रेस्टॉरेंटमध्ये कट्टरपंथी रेहान नावाच्या तरुणाने बांगलादेशी हिंदू (Hindu) तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित तरुणीचे वय १९ असून अत्याचारानंतर तिने घरात आत्महत्या केली आहे. त्यातच आरोपी रेहान बौफल हा उपजिल्हा राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष मोहसीन हवालदार यांचा मुलगा आहे.
( हेही वाचा : “उमेद, धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचा!”; उपसभापती Dr. Neelam Gorhe यांचे आवाहन)
दरम्यान पीडित बांगलादेशी (Bangladesh) हिंदू (Hindu) तरुणी इति दास (Iti Das) ही बारीशालमध्ये (Barishal) साहित्य विषयाचे शिक्षण घेत होती. सरस्वती पूजेला (Saraswati Puja) उपस्थित राहिल्यानंतर ती मैत्रिणीनंतर रेस्टॉरेंटमध्ये गेली होती. दरम्यान मृत पीडित तरुणीच्या वडील समीर दास यांनी सांगितले की, रेहानने सार्वजनिक ठिकाणी पीडितेवर विनयभंग केला आणि तिच्यावर हल्ला केला.
त्यानंतर अत्याचारानंतर मानसिक खच्चीकरण झालेली पीडिता आपल्या खोलीत गेली. कुटुंबियांनी तिला जेवण्यासाठी बोलवले. मात्र तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा तोडला असता ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणात आता कट्टरपंथी रेहानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशच्या (Bangladesh) माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार बरखास्त करण्यात आल्यानंतर हिंदूंवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्यात आता बांगलादेशची धुरा मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्या खांद्यावर आहे. त्यानंतर हिंदूंवरील (Hindu) होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात बांगलादेशात (Bangladesh) रान पेटू लागले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community