Bangladesh Violence: बांगलादेशमध्ये पुन्हा उफळला हिंसाचार! शेख मुजीबुर रहमान यांच्या घराची जाळपोळ, हिंदूंनाही केले लक्ष्य

51
Bangladesh Violence: बांगलादेशमध्ये पुन्हा उफळला हिंसाचार! शेख मुजीबुर रहमान यांच्या घराची जाळपोळ, हिंदूंनाही केले लक्ष्य
Bangladesh Violence: बांगलादेशमध्ये पुन्हा उफळला हिंसाचार! शेख मुजीबुर रहमान यांच्या घराची जाळपोळ, हिंदूंनाही केले लक्ष्य

बांगलादेशातील (Bangladesh) अनेक शहरांमध्ये पुन्हा हिंसाचार (Bangladesh Violence) उसळला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे वडील आणि बांगलादेशच्या संस्थापक शेख मुजीबुर रहमान (Sheikh Mujibur Rahman) यांच्या ढाका येथील धनमोंडी-३२ येथील निवासस्थानी बुधवारी (5 फेब्रु.) रात्री उशिरा निदर्शकांनी हल्ला केला आणि तोडफोड केली. (Bangladesh Violence)

हेही वाचा-नव्या आरोग्यसेवा निधीची वाट पाहणाऱ्या राज्य सरकारला Bombay High Court ने घेतले फैलावर

हल्ला झाला तेव्हा सुरक्षा दलही उपस्थित होते. गर्दीला तिथून निघून जाण्यास पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. सोशल मीडियावर ‘बुलडोझर रॅली’ची (Bulldozer Rally) घोषणा झाल्यानंतर हा हिंसाचार घडला. काही दंगलखोर तर निवासस्थाने आणि संग्रहालयांमध्येही घुसले. बाल्कनीवर चढून तोडफोड केली. घरालाही आग लावण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Bangladesh Violence)

हेही वाचा-BMC Budget 2025-26 : न्यायनिवाडा आणि थकबाकीपोटी महापालिकेची अडकली सुमारे ३३ हजार कोटींची रक्कम

निदर्शकांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या घराचे मुख्य गेट तोडून आत प्रवेश केला. यावेळी ते ‘त्यांना फाशी द्या, फाशी द्या’ असे ओरडत होते. शेख हसीनांना फाशी द्या. ‘मुजीबुरहमानची कबर खोदा’, ‘अवामी लीगच्या लोकांना मारा, ते बांगलादेशात राहणार नाहीत’ अशा घोषणा देत होते. (Bangladesh Violence)

हिंसाचार का झाला?
बांगलादेशमध्ये, अवामी लीगने 6 फेब्रुवारीपासून निषेध मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शेख हसीना यांच्यावर दाखल झालेल्या कथित खटल्यांच्या आणि अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वी, 5 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता शेख हसीना त्यांच्या समर्थकांना ऑनलाइन भाषण देणार होत्या. यापूर्वी हसीनाचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सकाळी 9 वाजता ‘बुलडोझर मार्च’ काढण्याची घोषणा केली होती. यासाठी सोशल मीडियावर प्रमोशन करण्यात आले. शेख हसीनांच्या वडिलांचे घर पाडले जाईल असे सांगण्यात आले होते, परंतु निदर्शकांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या धनमोंडी-३२ येथील घरावर 8 वाजता पोहोचून तोडफोड सुरू केली. (Bangladesh Violence)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.