-
ऋजुता लुकतुके
जसप्रीत बुमराहची पाठीची दुखापत चॅम्पियन्स करंडकापूर्वी बरी होईल की नाही, याविषयी भारतीय संघ प्रशासनाला अजून पुरेशी स्पष्टता नाही, असं कर्णधार रोहित शर्माने नागपूरमध्ये स्पष्ट केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पाचव्या कसोटीत बुमराहला पाठदुखीचा त्रास सुरू झाला. आणि तो सिडनीत दुसऱ्या डावांत गोलंदाजी करू शकला नव्हता. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याचा भारतीय संघात समावेश झाला होता. आणि तो तिसरा अहमदाबादचा सामना खेळेल असं पूर्वी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी म्हटलं होतं. पण, दोनच दिवसांपूर्वी बीसीसीआयने जो नव्याने संघ जाहीर केला होता, त्यात बुमराचं नाव नव्हतं. (Jasprit Bumrah)
(हेही वाचा- सरकारीकरण झालेल्या सर्वच मंदिरात वस्त्रसंहिता लागू करा; Maharashtra Mandir Mahasangh ची मागणी)
शिवाय बुमराह तपासणीसाठी बंगळुरूला दाखल झाला तिथूनही फारसे काही अपडेट नाहीत. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या दुखापतीविषयी अजून खरंच कुठलीही स्पष्टता आलेली नाही. ‘बुमराचे काही स्कॅन येत्या २-३ दिवसांत घेतले जाणार आहेत. आणि त्यानंतर त्याच्या दुखापतीचं स्वरुन समजेल,’ असं रोहीत नागपूर सामन्यापूर्वी झालेल्या कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत म्हणाला. (Jasprit Bumrah)
The waiting game continues on Jasprit Bumrah’s availability for the Champions Trophy.#CT25 #JaspritBumrah #RohitSharma pic.twitter.com/q5Rh0iDCTN
— Circle of Cricket (@circleofcricket) February 5, 2025
सुरुवातीला जसप्रीत बुमराहची दुखापत किरकोळ असल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात येत होतं. पण, आता ती तितकी किरकोळ नसल्याचं समोर येत आहे. आणि भारताचा हा मुख्य गोलंदाज चॅम्पियन्स करंडकात खेळण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. (Jasprit Bumrah)
त्याच्या अनुपस्थितीत तेज गोलंदाजीची धुरा नुकता दुखापतीतून परतलेला मोहम्मद शामी आणि नवखे हर्षित राणा व अर्शदीप सिंग यांना सांभाळावी लागणार आहे. बुमरा जर चॅम्पियन्स करंडकापूर्वी तंदुरुस्त झाला नाही तर भारतीय संघासाठी तो मोठा धक्का असेल, असं अलीकडेच रवी शास्त्रीने आपल्या युट्यूबवरील कार्यक्रमात म्हटलं होतं. ‘बुमराह भारतीय संघात नसेल, तर भारताची विजयाची शक्यता चक्क ३० ते ३५ टक्क्यांनी कमी होते,’ असं त्यांनी म्हटलं होतं. (Jasprit Bumrah)
(हेही वाचा- Ayodhya Ram Mandir: सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत रामलल्लाचे दर्शन घेता येणार, मंदिर ट्रस्टचा निर्णय)
चॅम्पियन्स करंडकासाठी एकदा जाहीर केलेल्या संघात किरकोळ बदल करायचे असतील तर ती मुदत १२ फेब्रुवारीपर्यंत आहे. म्हणजे बुमराच्या तंदुरुस्तीचा अंदाज घेण्यासाठी आणखी ५-६ दिवस भारताकडे आहेत. बीसीसीयचा वैद्यकीय चमू यावर अंतिम निर्णय घेईल. (Jasprit Bumrah)