America हून परतले १०४ भारतीय; कोणत्या राज्याचे नागरिक ?

आकडेवारीनुसार १९ हजार बेकायदेशीर भारतीयांना America तून हद्दपार केले जाईल.

89

अमेरिकेने बुधवारी अवैध प्रवाशांविरुद्धच्या धोरणा अंतर्गत १०४ अवैध भारतीय स्थलांतरितांना (Illegal Indian Immigrants) भारतात परत पाठवले. त्यांना घेऊन जाणारे अमेरिकन हवाई दलाचे विमान सी-१७ ग्लोबमास्टर २ वाजता अमृतसर (Amritsar) येथील हवाई दलाच्या हवाई तळावर उतरले. आकडेवारीनुसार १९ हजार बेकायदेशीर भारतीयांना हद्दपार केले जाईल. (trump impact) भारतात परतण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir: सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत रामलल्लाचे दर्शन घेता येणार, मंदिर ट्रस्टचा निर्णय)

या स्थलांतरितांमध्ये

हरियाणाचे ३३
गुजरातचे ३३
पंजाबचे ३०
महाराष्ट्रातील ३
उत्तरप्रदेशचे ३ आणि
चंदीगडचे २

नागरिक आहेत.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे सरकार आल्यानंतर अमेरिकेत अनेक निर्णय घेतले जात आहेत. त्यानंतरच बदललेल्या धोरणांनुसार अवैध ठरलेल्या अन्य देशांच्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्यात येत आहे.

३० हजार घुसखोरांना एकाच ठिकाणी ठेवणार

अवैध प्रवाशांना मायदेशी पाठविण्यासोबत काही जणांना क्यूबातील ‘ग्वांतानामो बे’ या कारागृहात हलविण्यात येत आहे. . अवैध प्रवाशांना ठेवण्यासाठी ही सर्वांत योग्य जागा असून, येथे किमान ३० हजार लोकांना ठेवता येऊ शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.