नांदेड (Nanded) तालुक्यातील मौजे कल्लाळ बोरगाव (Borgaon) येथे गोदावरी नदीमध्ये (Godavari River) अवैध वाळू उपसा (Illegal sand mining) करणारे 3 इंजिन जप्त करून क्रेनच्या साह्याने तहसील कार्यालयामध्ये आणण्यात आले. ज्याची किंमत अंदाजे 12 लाख रुपये आहे. (Crime News)
हेही वाचा-Ration Card : ई-केवायसी करा, नाहीतर ‘या’ तारखेनंतर रेशन धान्य होणार बंद
गोदावरी नदीमध्ये शासनाच्या अधिकृत वाळू डेपो शिवाय कोणी उत्खनन करून आढळून आल्यास यापुढे सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येतील असे प्रशासनातर्फे गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत सांगण्यात आले. महसूल विभागाने केलेली ही धाडसी कारवाई समजली जाते. (Crime News)
याकामी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वरकड यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी नहणू कानगुले, कुणाल जगताप, राजेंद्र शिंदे, ग्राम महसूल अधिकारी रणवीरकर, खेडकर, कदम, सकवान, माधव भिसे इत्यादी सहभागी होते. (Crime News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community