लोकप्रिय क्रिकेट समीक्षक Dwarkanath Sanzgiri यांचे दीर्घ आजाराने निधन

93

लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. संझगिरी (Dwarkanath Sanzgiri) यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) अखेरचा श्वास घेतला. पेशाने सिव्हिल इंजिनीयर असलेले संझगिरी मुंबई महापालिकेत (BMC) उच्च पदावर कार्यरत होते. क्रिकेट आणि मराठी साहित्यातल्या रुचीने त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला. मराठी क्रिकेटरसिकांनी त्यांच्या लिखाणाला नेहमीच पसंतीची दाद दिली. संझगिरी यांच्या पार्थिवावर ७ फेब्रुवारी या दिवशी दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

(हेही वाचा – Mumbai-Goa National Highway च्या पनवेल – इंदापूर टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार)

मराठी क्रिकेट रसिकांनी त्यांच्या क्रिकेटवरच्या लेखांना आणि इतर लेखांना कायमच दाद दिली होती. क्रिकेट विश्व, त्यावरच्या कथा लिहिणारी लेखणी शांत झाली आहे.

अशी होती कारकीर्द

द्वारकानाथ संझगिरी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते 2008 मध्ये मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. त्याचबरोबर त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख बनवली.

1970 च्या उत्तरार्धात द्वारकानाथ संझगिरी यांनी लेखन कारकीर्द सुरू केली. त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यांसारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले. भारताने इंग्लंडमध्ये 1983चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर, त्यांनी इतर काही मित्रांसह ‘एकच षटकार’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले होते, ज्यासाठी द्वारकानाथ संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले.

द्वारकानाथ संझगिरी यांनी 1983 पासून ते आजपर्यंतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप देखील कव्हर केले आहेत. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर ४० पुस्तके लिहिली आहेत.

अतिशय दु:ख वाटलं, द्वारकानाथ संझगिरी हे क्रिकेटप्रेमी, क्रिकेटवर रिसर्च करणारे, क्रिकेटमधील खाचखळग्यांचे ज्ञान असलेले, क्रिकेट, क्रिकेटीयर्स, क्रिकेट रेकॉर्डर्स याचे इनसायक्लोपीडिया असलेले, क्रिकेटच्या संदर्भातील प्रसंग याचे विश्लेषण करणारे आमचे मित्र संझगिरी (Dwarkanath Sanzgiri) गेले याचे दु:ख झाले, अशा शब्दांत बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांच्या भावाना व्यक्त केल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.