Old Tax Regime : येत्या २-३ वर्षांत नवीन कर रचना रद्दबादल होण्याचे अर्थ मंत्रालयाचे संकेत

Old Tax Regime : केंद्र सरकार या आठवड्यात संसदेत नवीन आयकर कायदा मांडणार आहे.

52
Old Tax Regime : येत्या २-३ वर्षांत नवीन कर रचना रद्दबादल होण्याचे अर्थ मंत्रालयाचे संकेत
  • ऋजुता लुकतुके

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला. नवीन कर रचनेत १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल अशी मोठी घोषणा सीतारमण यांनी केली. तर करमुक्त उत्पन्नाची मर्यादाही ३ लाखांवरून ४ लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. नवीन कर रचनेत आयकराचे टप्पेही बदलण्यात आले आहेत. या घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी जुन्या कर रचनेत कुठलेही बदल सुचवले नाहीत. तेव्हापासून एक चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे जुनी कर रचना हळू हळू हद्दपार करण्याच्या विचारात हे सरकार आहे. त्यातच नवीन आयकर विधेयक संसदेत येणार असल्यामुळे या घोषणेवर सगळ्यांचंच लक्ष आहे. आता केंद्रीय अर्थसचिव तुहिनकांत पांडेय यांनी यावर लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. (Old Tax Regime)

(हेही वाचा – ICC T20 Rankings : अभिषेक शर्मा ३८ स्थानांची झेप घेऊन आयसीसी क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानावर )

तुहिन कांत पांडेय मीडियाशी बोलताना म्हणाले की, नव्या कररचनेत करसवलत १२ लाख रुपयांपर्यंत दिली जाणार आहे. त्यामुळं जुनी कररचना आपोआप संपेल, अशी शक्यता आहे. आम्ही नवी करव्यवस्था आणली आहे, याचा उद्देश हा आहे की तुम्ही करातून सूट मिळवण्याबाबत कायम विचार करण्यापूर्वी आपल्या गरजेनुसार गुंतवणुकीचा विचार करावा. जुनी कररचना टप्प्या टप्प्यानं संपेल का असं विचारलं असता त्यांनी अर्थसंकल्पात जुन्या कररचनेसंदर्भात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामध्ये सूट आणि स्लॅबचे दर वेगवेगळे आहेत. मात्र, माझ्या मते जुनी कररचना आपोआप संपुष्टात येईल. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात एवढ्या मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व करदाते नव्या कररचनेत येतील. जर, तुम्हाला १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत हवी असेल तर तुम्ही काय कराल, असं तुहिन कांत पांडेय म्हणाले. (Old Tax Regime)

(हेही वाचा – Rohit Sharma : निवृत्तीच्या प्रश्नावरून भडकला रोहित शर्मा, पत्रकारांना दिलं खरमरीत उत्तर)

सर्व लोक नव्या कररचनेत आल्यानंतर जुनी करव्यवस्था आपोआप संपुष्टात येईल. याशिवाय नवी कररचना ही विवरणपत्र भरताना लगेच तुमच्यासमोर येते. जुनी कर रचना तुम्हाला निवडावी लागते. त्यामुळेही लोकांचा कल नवीन कर रचनेकडे असेल, असं पांडेय म्हणाले. तुहिन कांत पांडेय यांनी नवा प्राप्तिकर कायदा छोटा आणि सरळ असेल. समजून घेण्यासाठी सोपा असेल. जुन्या झालेल्या गोष्टी हटवल्या जातील. सर्व गोष्टी एका ठिकाणी आणल्या जातील, यामुळे कायदेशीवरा वाद कमी होतील, असं तुहिन कांत पांडेय म्हणाले. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ७५ टक्के लोकांनी नव्या कररचनेचा पर्याय स्वीकारल्याची माहिती दिली होती. जुन्या कररचनेत २५ टक्के करदाते आहेत. ते लवकरच नव्या कररचनेत येतील, अशी आशा सीतारमण यांनी व्यक्त केली होती. (Old Tax Regime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.