केरळमध्ये (Kerala) अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैगिक अत्याचाराची (Sexual assault) प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहे. २०१६ पासून अत्याचाराच्या बळी ठरलेल्या ४४ पीडितांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकाळात केरळमध्ये ही परिस्थिती उद्भवली आहे, गेल्या आठ वर्षांत ३१,००० हून अधिक POCSO प्रकरणे केरळमध्ये नोंदवली गेली आहेत. हे आकडे पाहून राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. (Kerala)
केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (Kerala State – Commission for Protection of Child Rights) अध्यक्षांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की, पीडितांना मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी आधाराची आवश्यकता आहे. ज्या मुलींवर अत्याचार होतता, त्यांना अनेकदा तीव्र नैराश्याचा सामना करावा लागतो. ज्यामुळे मानसिक आरोग्यावर (Mental health) नकारात्मक परिणाम होत असतो. आयोगाने सर्व संबंधित विभागांना पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. (Kerala)
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे की जून २०१६ ते २०२४ पर्यंत केरळमध्ये पोक्सोची ३१,१७१ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर २८,७२८ लोकांना अटक करण्यात आली. २०२२ पासून अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. २०१६ ते २०२१ दरम्यान दरवर्षी सुमारे ३,००० प्रकरणे नोंदवली जात होती, तर २०२२ मध्ये ही संख्या ४,५१८ पर्यंत वाढली आहे. (Kerala)
त्यानंतर २०२३ मध्ये ४,६४१ आणि २०२४ मध्ये ४,५९४ प्रकरणे नोंदवण्यात आली. या प्रकारच्या घटनांमुळे समाज आणि सरकार दोघेही चिंतेत पडले आहेत. जर आपण फक्त २०२५ बद्दल बोललो तर, वर्षाच्या पहिल्या १७ दिवसांत, POCSO अंतर्गत २७१ गुन्हे दाखल झाले आहेत आणि सुमारे १७५ जणांना अटक देखील करण्यात आली आहे. (Kerala)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community