मुलुंडमध्ये मासे विक्रेते बांगलादेशी मुसलमान; बनावट आधारकार्ड सापडले; Asmita Gokhale यांनी केला भांडाफोड

101
मुलुंडमध्ये मासे विक्रेते बांगलादेशी मुसलमान; बनावट आधारकार्ड सापडले; Asmita Gokhale यांनी केला भांडाफोड
मुलुंडमध्ये मासे विक्रेते बांगलादेशी मुसलमान; बनावट आधारकार्ड सापडले; Asmita Gokhale यांनी केला भांडाफोड

‘आपलं मुलुंड (Mulund) आपणच वाचवायला हवं, सतर्क रहा, सुरक्षित राहा..’ अशा आशयाची भाजपा कार्यकर्त्या अस्मिता गोखले यांची एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत भाजपा कार्यकर्त्या अस्मिता गोखले यांनी बांगलादेशी मुस्लिम तरुणांना पोलिसांच्या ताब्यात देतानाचा आपला अनुभव सांगितला आहे.

( हेही वाचा : अमेरिकेने १०४ भारतीय स्थलांतरितांना माघारी पाठवल्यानंतर परराष्ट्र मंत्री S Jaishankar यांचे मोठे विधान

अस्मिता गोखले (Asmita Gokhale) यांनी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, मी, स्मिता शितोळे (Smita Shitole) आणि आमच्या दोन महिला भगिनींनी महाकाली नगर रोडवरील मासे विक्री करणाऱ्या दोन बांगलादेशी मुस्लिम (Bangladeshi Muslims) असणाऱ्या तरुणांना नवघर पोलिस स्टेशनमधील पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईसह (Mumbai) सर्वत्र बांगलादेशी घुसखोरांचा (Bangladeshi infiltrators) सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अशातच मागील दोन तीन दिवसांपासून अस्मिता गोखले आणि त्यांच्या सहाकारी या मासेविक्री करणाऱ्या बांगलादेशी मुस्लिम तरुणांना ‘ कुठून आलात’ अशी विचारणा करत होते. त्यावर मी भिवंडीत राहतो, मासेविक्री करतो, अशी उत्तरे हे बांगलादेशी देत होते. एकेदिवशी त्यांनी नवीनच छापलेले आधारकार्ड अस्मिता गोखले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दाखवले. ते आधारकार्डही बंगाली भाषेत छापलेले असल्याची माहिती अस्मिता गोखले यांनी व्हिडिओत दिली आहे.

दरम्यान भाजपा कार्यकर्त्या अस्मिता गोखले यांना या तरुणांवर संशय आल्याने त्यांनी मुलूंड पोलिस स्टेशनला फोन करून यासंदर्भात माहिती दिली. अवघ्या १० मिनटात बांगलादेशी मुस्लिम (Bangladeshi Muslims) असणाऱ्या या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर काही वेळांनी मासेविक्री करणारे इतर बांगलादेशी मुस्लिम (Bangladeshi Muslims) तिथे आले. त्यांनीही आधीच्या तरुणांसारखीच उडवाउडवीची उत्तरे दिली. बांगलादेशात व्यवसाय चालत नाही, असे सांगून इकडे आल्याचे सांगितले, अशी माहिती अस्मिता गोखले (Asmita Gokhale) यांनी दिली. (Bangladeshi infiltrators)

त्याप्रकरणी भाजपा (BJP) कार्यकर्त्या अस्मिता गोखले (Asmita Gokhale) यांनी बांगलादेशी घुसखोरांकडून वस्तु नागरिकांनी विकत घेऊ नये, असे आवाहन केले आहे. तसेच अशी घटना घडताना दिसल्यास नागरिकांनी पुढाकार घेऊन बांगलादेशी घुसखोरांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे, असेही गोखले म्हणाल्या. त्याचबरोबर दोन पैसे कमी देतात म्हणून त्यांच्याकडून वस्तु घेऊ नका. ही त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. आपल्या माणसांकडून मासे घेण्यास काय समस्या आहे, असा सवालही गोखले यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला. मात्र या घटनेमुळे बांगलादेशी मुसलमानांचे मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात सुरु असणारी घुसखोरी चिंतेचा विषय ठरत आहे.

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.