Fighter Aircraft Crash: मध्य प्रदेशात हवाई दलाचं विमान कोसळलं, सुदैवाने दोन पायलट सुखरूप बचावले

68

मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यात हवाई दलाच्या लढाऊ विमानाला अपघात झाला आहे. या अपघातात संपूर्ण विमान जळून खाक झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत विमानातील दोन्ही पायलट सुखरूप बचावले असून जखमी झाले आहेत. (Fighter Aircraft Crash)

यासंदर्भातील माहितीनुसार, मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शिवपुरी जिल्ह्यातील सानी गावाजवळ हवाई दलाचे (air force)  मिराज २००० हे लढाऊ विमान (Mirage 2000 fighter jet Crash) गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी दुपारी नियमित सरावादरम्यान सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे अपघातग्रस्त होऊन कोसळले. हे विमान कोसळल्यानंतर जळून खाक झाले. विमानातील दोन्ही पायलट (pilot) बचावले असून जखमी झाले आहेत.

(हेही वाचा – Kharghar Ijtema नंतर धर्मांधांनी केली हिंदूची हत्या; बजरंग दलाने दिली कारवाईची चेतावणी)

अपघातानंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून, त्यामध्ये वैमानिक आपल्या सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती देताना दिसत आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

नियमित सरावादरम्यान हे विमान कोसळलं (MP plane crashed) असून, आतापर्यंत या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.