संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) गुरुवार 06 जानेवारी रोजी पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर वेपन सिस्टीमसाठी (Pinaka Multi-Barrel Rocket Launcher Weapon System) 10 हजार 200 कोटी रुपयांचा करार केला. नागपूरच्या सोलर इंडस्ट्रीज आणि मुनिशन्स इंडिया लिमिटेड (एमआयएल) कंपनीसोबत हा करार करण्यात आला. (Pinaka Rocket Launcher)
यासंदर्भात संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने गेल्या आठवड्यात भारतीय लष्करास दारूगोळा (Ammunition) खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. हा प्रकल्प नागपुरातील रॉकेट निर्माता सोलर इंडस्ट्रीज आणि माजी ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड कंपनी असलेल्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) यांच्यात विभागला जाणार आहे.
(हेही वाचा – राज्य सरकारने Ladki Bahin Yojana सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी केली ‘ही’ तयारी)
यापूर्वी 13 जानेवारी रोजी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (Army Chief General Upendra Dwivedi) म्हणाले होते की, 5700 कोटी रुपयांच्या दारूगोळ्यासह पिनाका रॉकेट खरेदी करार आणि 4500 कोटी रुपयांच्या एरिया डिनायल दारूगोळ्याचा करार सरकारकडून लवकरच मंजूर होण्याची अपेक्षा आहे. भारतीय संरक्षण संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आधीच पिनाका रॉकेटच्या 120 किमीपर्यंतचे लक्ष्य अचूक भेदणाच्या टप्प्यात आहे.
(हेही वाचा – जय भीम म्हणणे काँग्रेसची मजबुरी; PM Narendra Modi यांचा गंभीर आरोप)
पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट सुमारे 45 किलोमीटर टप्प्यातील लक्ष्यावर प्रहार करु शकते. हे रॉकेट लाँचर (Rocket Launcher) पाकिस्तान आणि चीन दोन्ही सीमेवर खूप प्रभावी ठरू शकते. लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, पिनाकाच्या लांब पल्ल्याच्या आवृत्त्या तयार झाल्यानंतर लष्कर इतर पर्यायी शस्त्रांच्या वापर थांवबू शकते. पिनाका हे निर्यात क्षेत्रात आधीच एक मोठी यशोगाथा बनले आहे.
हेही पाहा –