शैक्षणिक संस्थांना Textbook चा पुरवठा करणाऱ्या रकमेत अफरातफर; प्राचार्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

37
शिक्षण संस्थांसाठी (Educational institutions) मागविण्यात येणाऱ्या पुस्तकांची (Textbook Scam) शाळेच्या प्राचार्याच्या मदतीने परस्पर खुल्या बाजारात विक्री करुन दोन सेल्समननी पुस्तके पुरवठादार कंपनीची ३४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या जुम्मा मस्जिद चेरिटेबल ट्रस्ट इंटननॉशनल स्कुलच्या (Jumma Masjid Charitable Trust International School, Nashik) (जेएमसिटी) प्राचार्यासह सेल्समन आणि तीन जणांविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Textbook)

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, चेतना एज्युकेशनची (Chetana Education) यात फसवणूक झाली असून कंपनीतर्फे सायली मोरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची कंपनी ही शालेय शिक्षणासाठी लागणारी पुस्तके तयार करून संपूर्ण भारतात पुरवठा करते. कंपनीने जिल्हा निहाय सेल्समनची नेमणूक केली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी कंपनीने जितेंद्र साळवे याची जुलै २०२१ पासून नियुक्ती केली होती. साळवे हा नाशिकमधील शाळा आणि पुस्तक विक्रेत्याकडे कंपनीच्या पुस्तकांची जाहिरात करून ऑर्डर घेत होता.

(हेही वाचा – Ind vs Eng, 1st ODI : इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ४ गडी आणि ६८ चेंडू राखून विजय)

नाशिकच्या जेएमसीटीच्या शाळेच्या नावाने कंपनीकडून मागविण्यात आलेल्या पुस्तकांची जून २०२१ पासून थकबाकी होती. याबाबत कंपनीने साळवेला विचारणा केली असता शाळा लवकरच पैसे देईल असे त्याने सांगितले. अखेर, कंपनीने शाळेकडे चौकशी केली. त्यावर, शाळेने घेतलेल्या पुस्तकांची रक्कम ही साळवेला दिल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मात्र साळवेने पुस्तके शाळेच्या नावावर कंपनीकडून मागवली होती.

काही पुस्तक ही शाळेने स्विकारली आणि उर्वरीत पुस्तक ही त्याने शाळेच्या प्राचार्य चित्रा घस्टे यांच्याशी संगमत करत खुल्या बाजारात विक्री केल्याचे सांगितले. तसेच, जेएमसिटी शाळेला साहित्य पुरविताना साहित्यांच्या बिलाची रक्कम धनादेशा‌द्वारे किवा ऑनलाईन कंपनीला न देता घस्टे यांनी सेल्समन साळवेला रोख स्वरुपात रक्कम दिल्याचे उघड झाले. याबाबत दैनंदिन रजिस्टरमध्ये कच्ची नोंद घेवून साळवेच्या सह्या घेतल्याचे उघड झाले. साळवे याने अशाप्रकारे २६ लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

(हेही वाचा – मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य आणि मजबूत असावा; Nitesh Rane यांच्या सूचना)

रत्नागिरी जिल्ह्यासाठी सेल्समन म्हणून नेमणूक केलेल्या सेल्समन संतोष जगताप याने रत्नागिरीतील १७ ठिकाणचे पैसे अशाचप्रकारे परस्पर हडपल्याचे समोर आले आहे. जगताप याने कंपनीची ८ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. अखेर कंपनीने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात (N.M. Joshi Marg Police Station) एकूण ३४ लाख ५८ हजारांच्या फसवणूकीची तक्रार दिली आहे.  दरम्यान, चेतना एज्युकेशन कंपनीने केलेल्या आरोपात तथ्य नसून त्याबाबतचे सर्व पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्याबाबत माहिती नसल्याचे जेएमसिटीच्या प्राचार्या चित्रा घस्टे (JMCT Principal Chitra Ghaste) यांनी सांगितले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.