उत्तुंग इमारतींसाठी Fire Brigade घेणार ‘यांची’ मदत

46
उत्तुंग इमारतींसाठी Fire Brigade घेणार 'यांची' मदत
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत मागील काही वर्षांपासून टोलेजंग इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात असून या उत्तुंग इमारतींचे बांधकाम होत असतानाच त्याठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात असक्षम ठरत आहे. मुंबईत मागील काही महिन्यांमध्ये या उत्तुंग इमारतींमध्ये आग लागण्याचे प्रकार अधिक होत आहेत. त्यामुळे या टोलेजंग इमारतींमध्ये आगीच्या घटनांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्यावतीने क्रॉम्प्रेस एअर फोर्स सिस्टीम अर्थात सीएएफएस व ड्रोन सारख्या नवीन अग्निशमन यंत्रणांचा वापर केला जाणार आहे. (Fire Brigade)

(हेही वाचा – Sion Hospital : शीव रुग्णालयात हृदय विकाराशी संबंधित जटील चाचणीसाठी ‘ट्रान्स इसोफेजिअल इको प्रोब’!)

मुंबई महापालिकेच्या सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय भाषणांत बोलतांना मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या यंत्रणांची माहिती दिली आहे. मुंबईमध्ये सध्या उत्तुंग इमारती बांधल्या जात आहे, त्या उत्तुंग इमारतींमध्ये आगीसारख्या घटना घडल्यास त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी प्रत्येक इमारतींमध्ये यंत्रणा असली तरी बऱ्याच वेळेला त्या कार्यान्वित नसतात. त्यामुळे या उत्तुंग इमारतींमध्ये क्रॉम्प्रेस एअर फोर्स सिस्टीम अर्थात सीएएफएस चा वापर केल्यास ३०० ते ४०० मीटर उंचीपर्यंत अर्थांत १०० मजल्यापर्यंतच्या इमारतींमधील आगीवर नियंत्रण मिळवता येवू शकते. (Fire Brigade)

(हेही वाचा – BMC : जळजोडणी आणि दुरुस्तीची कामे पूर्ण; ‘या’ भागांतील पाणीपुरवठा होणार सुरळीत)

तसेच ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. महापालिकेच्यावतीने मागील दोन ते तीन वर्षांपासून मुंबई अग्निशमन दलात ड्रोनचा वापर करण्याची सूचना केली जात आहे. परंतु ६७ मीटर पेक्षा अधिक उंचीपर्यंत या ड्रोनचा वापर होवू शकत नाही. त्यामुळे या ड्रोनचा वापर अधिक उंचीच्या इमारतींसाठी कसा होवू शकतो याची चाचपणी केली जात असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Fire Brigade)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.