आकाशवाणी Amdar Niwas मध्ये आग; अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळवले नियंत्रण

62
आकाशवाणी Amdar Niwas मध्ये आग; अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळवले नियंत्रण
आकाशवाणी Amdar Niwas मध्ये आग; अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळवले नियंत्रण

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये शुक्रवार, ७ फेब्रुवारी या दिवशी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती मिळताच त्यांनी घटना स्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

(हेही वाचा – आकाशवाणी Amdar Niwas मध्ये आग; अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळवले नियंत्रण)

ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचे समजते. आमदार निवासातील रुम नंबर ३१३ ला ही आग लागली. त्यानंतर ती पसरत गेली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राज्यभरातून आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी निवासाला येत असतात. या इमारतीच्या बाजूलाच मंत्रालय आहे.

आम्ही झोपलेलो असतांना आगीचे गोळे अंगावर पडत असल्याचे लक्षात आल्यावर आम्ही अग्नीशमन विभागाला कळवले, असे त्या खोलीत रहाणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

वित्तहानी किती झाली, याची तपशील अद्याप समोर आलेला नाही. वेळेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.