Ind vs Eng, 1st ODI : विराट कोहलीला झालेली दुखापत नेमकी किती गंभीर?

Ind vs Eng, 1st ODI : गुडघा सूजल्यामुळे विराट पहिला एकदिवसीय सामना खेळला नाही

40
Ind vs Eng, 1st ODI : विराट कोहलीला झालेली दुखापत नेमकी किती गंभीर?
Ind vs Eng, 1st ODI : विराट कोहलीला झालेली दुखापत नेमकी किती गंभीर?
  • ऋजुता लुकतुके 

नागपूरमध्ये नाणेफेकीसाठी रोहित शर्मा मैदानावर आला तेव्हा आल्या आल्याच त्याने एक सनसनाटी बातमी दिली. ‘विराटला काल रात्री गुडघ्याचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे आज तो खेळणार नाही,’ असं रोहित म्हणाला आणि तिथून चर्चेला सुरूवात झाली. विराटला नेमकं काय झालंय. आणि तो कधी तंदुरुस्त होईल, असे प्रश्न चाहत्यांना पडले. समालोचन करताना रवी शास्त्री एक महत्त्वाचा अपडेट बोलून गेला. ‘विराटच्या डाव्या गुडघ्याला सूज आल्याचं समजतंय. त्यामुळे तो खेळणार नाहीए,’ असं शास्त्री म्हणाला. (Ind vs Eng, 1st ODI)

(हेही वाचा- मिठाईत किडे सापडल्याने उडाली खळबळ; FDA ने केली कारवाई)

बीसीसीआयने नेहमीप्रमाणे, एका वाक्यात मीडियाला या अपडेटची माहिती दिली. ‘विराट गुडघ्याच्या दुखापतीमुळे नागपूरच्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता,’ इतकंच बीसीसीआयने कळवलं. पण, विराटला नेमकं काय झालंय. आणि तो कधी तंदुरुस्त होणार यावर कुठलाही अपडेट संघ प्रशासनाने दिलेला नाही. विराट संघाबरोबर बुधवारी सरावात तर उतरला. पण, त्याने फलंदाजीचा सराव फारसा केला नाही. थोडाफार सराव केला तेव्हा तो अडखळत चालत असल्याचं दिसत होतं. आणि डावा गुडघा पूर्णपणे टेपमध्ये होता. सकाळीच त्याची तंदुरुस्तीची चाचणी झाल्याचंही समजलं. आणि संघाचे फीजिओ कमलेश पूर्णवेळ विराटबरोबर होते. (Ind vs Eng, 1st ODI)

भारतीय संघाला अलीकडे एकदिवसीय सामने फारसे खेळायला मिळालेले नाहीत. ऑस्ट्रेलियात दीड महिना कसोटी क्रिकेट खेळल्यानंतर भारतीय संघ ३ सामन्यांची ही मालिका खेळणार आहे. आणि लगेचच १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स करंडकाला सुरुवात होणार आहे. अशावेळी विराटला सरावासाठी फक्त हे तीन सामने उपलब्ध होते. उर्वरित दोन सामने तो खेळू शकेल का हा प्रश्नच आहे. सध्यातरी त्याच्या गुडघ्यावर स्कॅन केलेले नाहीत. आता विराट संघाबरोबर कटकला जातो की तपासणीसाठी झटपट बंगळुरूला क्रिकेट अकादमीत जाऊन येतो हे पहावं लागणार आहे. (Ind vs Eng, 1st ODI)

(हेही वाचा- ऐतिहासिक वाघनखे नागपुरात! Devendra Fadnavis यांच्या हस्ते होणार प्रदर्शनाचं उद्घाटन)

१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स करंडक स्पर्धा सुरू होत आहे. आणि जसप्रीत बुमरानंतर आता विराट कोहलीच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं तर भारतासाठी हा मोठा धक्का असेल. दोघंही स्टार आणि संघासाठी भरवशाचे खेळाडू आहेत. (Ind vs Eng, 1st ODI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.