-
ऋजुता लुकतुके
युवा तेज गोलंदाज हर्षित राणाचं कसोटी आणि टी-२० पदार्पण जसं गाजलं, तसंच एकदिवसीय पदार्पणही त्याने गाजवलं आहे. आणि पदार्पणातच अनोखा विक्रम त्याच्या नावावर लागला आहे. तीनही प्रकारात पदार्पणात ३ बळी घेण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर लागला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे. नागपूरमध्ये हर्षितने शमीच्या बरोबरीने गोलंदाजीची सुरुवात केली. तो काहीसा महागडा ठरला असला तरी त्याने ३ बळीही मिळवले. फिल सॉल्ट आणि बेन डकेट ही जोडी ७५ धावांच्या सलामीनंतर फुटली. आणि त्यानंतर सामन्यातील दहाव्या षटकांत हर्षितने आधी बेन डकेटला बाद केलं. तर शेवटच्या चेंडूंवर धोकादायक हॅरी ब्रूकलाही त्याने शून्यावर बाद केलं. त्यानंतर ३६ व्या षटकांत त्याने लिअम लिव्हिंगस्टोनला बाद केलं. (Ind vs Eng, 1st ODI)
(हेही वाचा- मिठाईत किडे सापडल्याने उडाली खळबळ; FDA ने केली कारवाई)
आणि एकूण ७ षटकांत ५३ धावा देत त्याने ३ बळी मिळवले. आपल्या पहिल्या ३ षटकांमध्ये हर्षितने ३७ धावा दिल्या होत्या. सॉल्टने त्याच्या एकाच षटकांत २३ धावा वसूल केल्या. पण, त्यानंतर त्याला गोलंदाजीचा एंड बदलून दिल्यावर त्याने उर्वरित ४ षटकं प्रभावी गोलंदाजी केली. एक निर्धाव षटकही त्याने टाकलं. (Ind vs Eng, 1st ODI)
Harshit Rana becomes the FIRST Indian with at least 3 wickets on Test, ODI and T20I debut. pic.twitter.com/9zp8scdKOy
— Kausthub Gudipati (@kaustats) February 6, 2025
याच महिन्यात हर्षितने आपलं टी-२० पदार्पण केलं आहे. पुण्यातील सामन्यात शिवम दुबेला डोक्यावर चेंडू बसल्यामुळे कन्कशन बदली खेळाडू म्हणून हर्षित राणा मैदानात आला. आणि त्याने २३ धावांत ३ बळी घेत आपलं पदार्पण साजरं केलं होतं. कन्कशन बदली खेळाडूसाठी फलंदाजाला फलंदाज तर गोलंदाजाला गोलंदाज असा बदली खेळाडू देण्याचा नियम असताना शिवमचा बदली खेळाडू हर्षित कसा असू शकतो, असा आक्षेप तेव्हा इंग्लिश संघाने घेतला होता. (Ind vs Eng, 1st ODI)
(हेही वाचा- Natural Calamities पीडितांच्या बँक खात्यावर ५९२ कोटी ३४ लाखाची मदत डीबीटीद्वारे वर्ग)
गेल्यावर्षी हर्षित बोर्डर – गावसकर मालिकेतही २ कसोटी खेळला आहे. आणि यात पर्थमध्ये त्याने ४८ धावांत ३ गडी बाद केले होते. पहिल्या डावांत ऑस्ट्रेलियाला झटपट गुंडाळण्यात त्याचा मोठा वाटा होता. २३ वर्षीय हर्षित राणा भारताकडून आतापर्यंत २ कसोटी, १ टी-२० आणि एक एकदिवसीय सामना खेळला आहे. या मालिकेत जायबंदी जसप्रीत बुमराचा बदली खेळाडू म्हणून त्याचा समावेश झाला आहे. आणि बुमरा वेळेवर तंदुरुस्त झाला नाही तर हर्षित चॅम्पियन्स करंडकातही खेळू शकतो. (Ind vs Eng, 1st ODI)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community