-
ऋजुता लुकतुके
रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आपलं पहिलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना सर्वसामान्यांना आणखी दिलासा देऊ केला आहे. रेपोदरात ०.२५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. रिझर्व्ह बँकेच्या ६ पैकी ६ तज्जांनी दर कपातीच्या बाजूने कौल दिल्याचं ते म्हणाले. यामुळे येणाऱ्या दिवसांत मध्यमवर्गीयांची कर्ज काहीशी स्वस्त होऊ शकतील. आणि व्याजदरांतही कपात झाल्यामुळे हफ्ते कमी होतील. (RBI Monetary Policy)
त्याचबरोबर जागतिक अस्थिरतेचा उल्लेख करत मल्होत्रा यांनी भारतीय बाजारात जास्तीत जास्त रोखता कशी राहील याचा आढावा रिझर्व्ह बँके घेत असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर आर्थिक वर्ष २०२६ साठीचा देशाचा आर्थिक विकास दर ६.७५ टक्के असेल असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. तर देशाचा महागाई दर ४.८ टक्क्यांवर राहील असाही रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. अमेरिकेतील देशांतर्गत परिस्थिती सुधारत असल्यामुळे तिथे बाँड आणि रोख्यांवर चांगला परतावा मिळत आहे. त्याचा परिणाम भारतीय रुपयावर प्रतिकूल होत आहे. आणि त्यामुळे येणारे महिने हे मध्यवर्ती बँकेसाठी आव्हानात्मक असतील हे मल्होत्रा यांनी मान्य केलं. (RBI Monetary Policy)
(हेही वाचा- नवीन कायदे लागू करताना कामगार हिताची काळजी घेणार; Akash Pandurang Fundkar यांची ग्वाही)
पतधोरणातून बाहेर आलेली महत्त्वाची निरीक्षणं पाहूया,
-
रेपोदरात ०.२५ टक्क्यांची कपात. १,००,००० लाखांवरील मासिक हफ्त्यात ४२५ रुपयांपर्यंतची बचत होऊ शकेल
-
देशाचा महागाई दर ४.८ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज
-
तर आर्थिक वर्ष २०२६ साठी जीडीपी विकासदर ६.७५ टक्के राहण्याचा अंदाज
-
ट्रेडिंग व्यवहार पूर्ण करण्याचा वेळ कमी करण्यासाठी उपाययोजना करणार. त्यासाठी कार्यकारी गटाची निर्मिती करणार
-
बँकेतर बित्तीय संस्थांमध्ये सायबर सुरक्षेवर भर देणार
-
परदेशात पैसे पाठवायचे असतील तर दोन वेळा सुरक्षा तपासणी करणार
-
ग्रामीण भागातून वस्तू व सेवांची मागणी वाढल्याचा उल्लेख
-
देशाचा उत्पादन क्षेत्राचा विकासदर आश्वासक
हेही पहा-
Join Our WhatsApp Community