Ind vs Eng, 1st ODI : हर्षित, यशस्वीचं एकदिवसीय पदार्पण, दोघांना भारतीय कॅप मिळाल्या तो क्षण

Ind vs Eng, 1st ODI : हर्षितला शमीकडून तर यशस्वीला रोहितकडून भारतीय कॅप मिळाली

38
Ind vs Eng, 1st ODI : हर्षित, यशस्वीचं एकदिवसीय पदार्पण, दोघांना भारतीय कॅप मिळाल्या तो क्षण
Ind vs Eng, 1st ODI : हर्षित, यशस्वीचं एकदिवसीय पदार्पण, दोघांना भारतीय कॅप मिळाल्या तो क्षण
  • ऋजुता लुकतुके 

तसा यशस्वी जयसवाल मागचं अख्खं वर्ष भारतीय संघाबरोबर आहे. त्याच्या नावावर कसोटीत दोन द्विशतकं आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खणखणीत दीडशतकही लागलं आहे. पण, अजूनही तो एकदिवसीय क्रिकेट खेळलेला नव्हता. तो योग जुळून आला तो नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत. यशस्वी जयसवाल आणि हर्षित राणा या दोघांनी नागपूरमध्ये भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केलं. सामन्यापूर्वी काही तास आधी मैदानातच या दोघांना भारताची आंतरराष्ट्रीय कॅप देण्याचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. (Ind vs Eng, 1st ODI)

(हेही वाचा- AT4 In Indian Army : भारतीय सशस्त्र दलांत अँटी-आर्मर वेपन सिस्टम AT4 दाखल ; लष्कराची ताकद वाढणार)

त्यानंतर नाणेफेकीच्या दरम्यान रोहितने सगळ्यांसमोर ती बातमी उघड केली. ‘संघात मोहम्मद शमी एका वर्षानंतर परतलाय. विराट गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळत नाहीए. तर यशस्वी आणि हर्षित या सामन्यातून एकदिवसीय संघात पदार्पण करत आहेत,’ असं रोहितने सांगितलं. (Ind vs Eng, 1st ODI)

रोहितनेच सलामीचा साथीदार यशस्वी जयसवालला त्याची कॅप प्रदान केली. तर हर्षितला मोहम्मद शमीने त्याची कॅप दिली. (Ind vs Eng, 1st ODI)

 यशस्वी आधीच भारताकडून १९ कसोटी आणि २३ टी-२० सामने खेळलेला आहे. पण, एकदिवसीय सामना खेळण्याची संधी त्याला मिळाली नव्हती. (Ind vs Eng, 1st ODI)

 हर्षितने पदार्पणात ५३ धावांत ३ बळी घेण्याची कामगिरी केली. तर यशस्वी रोहितसह सलामीला खेळताना २२ चेंडूंत १५ धावा करून बाद झाला. त्याने ३ चौकार लगावत सुरुवात तर चांगली केली होती. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर तो चकला. आणि यष्टीरक्षक फिल सॉल्टकडे झेल देऊन बाद झाला. ऑगस्ट २०२४ नंतर भारतीय संघ आपली पहिली एकदिवसीय मालिका खेळत आहे. त्या मालिकेत लंकेविरुद्ध भारताचा ०-२ ने पराभव झाला होता. इंग्लंडविरुद्धची मालिका चॅम्पियन्स करंडकापूर्वी सरावाची शेवटची संधी आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी मालिकेचं महत्त्व मोठं आहे. (Ind vs Eng, 1st ODI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.