Mumbai Crime : मुंबई एनसीबीची मोठी कारवाई ! 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, विदेशी रॅकेट आलं समोर

47
Mumbai Crime : मुंबई एनसीबीची मोठी कारवाई ! 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, विदेशी रॅकेट आलं समोर
Mumbai Crime : मुंबई एनसीबीची मोठी कारवाई ! 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, विदेशी रॅकेट आलं समोर

मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Mumbai NCB) मोठी कारवाई (Mumbai Crime) केली असून 200 कोटींच्या किंमतीचे ड्रग्ज (Drugs) हस्तगत केले आहे. पोलिसांनी केलेल्या छापेमारीत 11.5 किलो उच्च गुणवत्तेचं कोकीन, 4.9 किलो हायब्रीड स्ट्रेन हाइड्रोपोनिक, 200 पॅकेट (5.5 किलोग्राम) गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी, मुंबई (Mumbai) पोलिसांनी आत्तापर्यंत 4 जणांना अटक केली आहे. (Mumbai Crime)

हेही वाचा-Fire in Mahakumbh: महाकुंभमेळा परिसरात पुन्हा लागली आग ; ५ मिनटांत मिळवले नियंत्रण

मुंबई पोलिसांनी मुंबई स्थित एक आंतरराष्ट्रीय कुरियर एजेंन्सीवर प्राथमिक कारवाई करत ड्रग्ज हस्तगत केले होते. या एजन्सीकडून एक पार्सल आस्ट्रेलियात (Australia) पाठविण्यात आले होते, त्यानंतर नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मुंबई एनसीबीला मिळाली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (Mumbai Crime)

हेही वाचा-Mahakumbh साठी निघालेल्या 8 दोस्तांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत ; धावत्या बसचा टायर फुटला आणि …

विदेशात राहणाऱ्या लोकांचा एक समुह सक्रीय असून अमेरिकेतून मुंबई आणि भारतातील अनेक राज्यात तसेच विदेशांतही कुरिअरद्वारे ड्रग्जचा पुरवठा केला जात होता. याप्रकरणी, एक आरोपी नाव बदलून राहात असून ड्रग्ज व अम्लपदार्थांच्या तस्करीसाठी होणारा संवाद हा एका विशिष्ट कोडवर्डमधून केला जात आहे. याप्रकरणी, आत्तापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. तर, या ड्रग्स रॅकेटप्रकरणी देश व विदेशातील व्यक्तींचा तपास मुंबई एनसीबीकडून केला जात आहे. (Mumbai Crime)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.