पुण्यापाठोपाठ GBS चा मुंबईत शिरकाव; ‘या’ ठिकाणी आढळला पहिला रुग्ण

97

पुण्यात मागील काही दिवसांपासून GBS (Guillain-Barre Syndrome) चे रुग्ण मोठ्या प्रामाणात आढळत आहेत. त्याच पाठोपाठ आता मुंबईत ही पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. पुण्यामध्ये जीबी सिंड्रोम आजाराचा वेगाने प्रसार होत आहे. आतापर्यंत मुंबईत या आजाराचा एकही रुग्ण आढळला नव्हता. पण आता मुंबईत पहिला रुग्ण आढळला आहे त्यामुळे आरोग्य विभाग (Department of Health) सतर्क झाला आहे.   (GBS)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी पूर्व (Andheri GBS patients) परिसरात एका पुरुषाला दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच गुलेन बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएस आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात ही व्यक्ती राहते. या व्यक्तीवर सध्या महापालिकेच्या सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहे.

(हेही वाचा – Ind vs Eng, 1st ODI : रवींद्र जडेजाचे ६०० आंतरराष्ट्रीय बळी पूर्ण, ही कामगिरी करणारा पाचवा भारतीय गोलंदाज)

अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे स्थानिक आमदार मुरजी पटेल (MLA Murji Patel) यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी ५० विशेष बेड राखीव ठेवण्याची सूचना केली. शिवाय या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील मुरजी पटेल यांनी केल्या आहेत.

दरम्यान, पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमची (GBS Pune) लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात रुग्णांचा आकडा १७३ वर पोहचला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात १७० संशयीत जीबीएस बाधित रुग्णांपैकी १४० रुग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. २१ रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. या आजारामुळे आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

जीबीएस आजाराची लक्षणं –

काळजी कशी घ्याल?
  • पाणी उकळून व गाळून प्यावे.
  • उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
  • अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.