-
प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या विरोधी आघाडीतील सहकाऱ्यांना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील पराभव अद्याप पचवता आलेला नाही. त्याच धक्क्यातून ते सावरू शकले नसल्याने आता ते थेट मतदारसंख्येवरच शंका उपस्थित करत आहेत, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे.
राहुल गांधींच्या आरोपांना भाजपा प्रदेशाध्यक्षांचे प्रत्युत्तर
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स (Twitter) वर पोस्ट करत राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर होणार आहे, आणि पराभव दिसून आल्याने राहुल गांधी यांनी आतापासूनच रडारड सुरू केली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
“जनतेने काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना सातत्याने नाकारले आहे. हे वास्तव स्वीकारण्याची राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मानसिकता नाही. त्यामुळेच ते आता पराभवाची कारणे शोधत आहेत. पण आता निवडणूक प्रक्रियेलाच दोष देणे ही त्यांची निराशेची परिसीमा आहे,” असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
🔸काँग्रेस नेते @RahulGandhi आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. किंबहुना पराभवाच्या त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत. खरं तर निवडणूक आयोगानं यापूर्वीच…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) February 7, 2025
(हेही वाचा – Indians Deportation from US : काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी राहुल गांधी, खरगे यांना दाखवला आरसा )
ईव्हीएमवरही संशय – राहुल गांधींना टोला
बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवरही प्रहार केला. “राहुल गांधी यांच्यासोबत पत्रकार परिषदेतच सुप्रिया सुळे बसल्या होत्या. त्यांनी स्वतः कबूल केले की त्या त्याच ईव्हीएमवर निवडून आल्या. मग राहुल गांधींना ईव्हीएमवर शंका का वाटते? हा निव्वळ नौटंकीबाजपणा आहे,” असे ते म्हणाले.
लोकशाहीची बदनामी बंद करा – भाजपा नेते आक्रमक
भाजपा प्रदेशाध्यक्षांनी पुढे सांगितले की, “राहुल गांधींनी लोकशाहीवर विश्वास ठेवावा आणि निराधार आरोप करून देशाच्या निवडणूक प्रक्रियेची विटंबना करू नये.” त्यांनी असेही सांगितले की, “देशातील जनतेला काँग्रेसचा खोटारडेपणा पुरता कळून चुकला आहे. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसला नाकारले आहे.”
भाजपा नेत्यांच्या या हल्ल्यानंतर काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community