बांगलादेशी घुसखोरांना खोटे दाखले बनवून देणारे पोलिसांच्या रडारवर; अकोल्यात Kirit Somaiya तक्रार करणार दाखल

76

राज्यासह देशभरात मागील काही दिवसांपासून अवैध रित्या राहणारे मुसलमान बांगलादेशी आणि रोहिंग्या (Bangladeshi and Rohingya infiltrators) यांचे प्रमाण वाढले आहेत. संबंधित नागरिकांना भारतातून हुसकावून लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अकोल्यात बांगलादेशी घुसखोर असल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर रामदासपेठ पोलिसांनी खोट्या टीसी (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) (Fake School TC) बनवून जन्माचे दाखले बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि बनवणाऱ्या १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांनीच टीसीमध्ये खाडाखोड केल्याचे समोर आले आहे. हे सर्व आता पोलिसांच्या रडारवर आहेत.  (Kirit Somaiya)

मिळालेल्या माहितीनुसार, रामदासपेठ पोलीस ठाण्यात (Ramdaspeth Police Station) अकोल्याच्या नायब तहसीलदार स्वप्नाली काळे यांनी तक्रार दिली. त्यात त्यांनी १२ जणांनी जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोट्या टीसी दिल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या सर्व १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यापैकी तीन जणांना अटक केली आहे. सर्वांनीच बनावट टीसीचा वापर केल्याने किरीट सोमय्या यांच्या आरोपाला बळ आले आहे. गुरुवारी पुन्हा किरीट सोमय्या यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली. त्यांना शहरात बांगलादेशी अधिवास करत असल्याचे पुरावेही दिले आहेत.

(हेही वाचा – पुण्यापाठोपाठ GBS चा मुंबईत शिरकाव; ‘या’ ठिकाणी आढळला पहिला रुग्ण)

अकोला जिल्ह्यात ३० ते ७० वयोगटातील १५ हजार ८४५ बांगलादेशी लोकांना जन्मप्रमाणपत्र देण्यात आले असून, त्यापैकी बार्शीटाकळी तालुक्यात एक हजर ३१९ लोकांचा समावेश आहे, अशा नागरीकांवर कारवाई करण्याची तक्रार आपण अकोल्यात व अमरावती जिल्ह्यातील (Akola District) अंजनगावला करणार असल्याचेही त्यांनी यावेळी किरीट सोमय्या यांनी सांगितले.

गुरुवारी पुन्हा किरीट सोमय्या यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांची भेट घेतली. त्यांना शहरात बांगलादेशी अधिवास करत असल्याचे पुरावेही दिले आहेत. सोमय्या यांच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी त्यांचे बयाण नोंदवले. यावेळी सोमय्या यांनी आणखी १६ संशयितांचे नावे पोलिसांना दिली आहेत की ज्यांनी बनावट टीसी बनवून जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते. महसूल विभागाने सर्व आरोपीचे टीसीची त्या त्या शाळांमध्ये जावून चौकशी केली. त्यावेळी त्यांना धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कुणाच्या नावांमध्ये खाडाखोड तर कुणाच्या जन्मतारखेमध्ये खाडाखोड दिसून आली. तसेच शाळेतील मूळ टीसी आणि आरोपींकडील टीसीत बरेच बदल दिसून आले. त्या सर्वांचीच तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Indian Army Killed 7 pakistani : ‘LOC’वर भारतीय सैन्याची मोठी कारवाई ! 7 पाकिस्तानी घुसखोरांना घातले कंठस्नान)

नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिघांना अटक केली आहे. सखोल चौकशी सुरू आहे. आरोपींनी जन्म प्रमाणपत्रासाठी बनावट टीसीचा वापर केल्याचे दिसून येत आहे. अनेक टीसीवर खाडाखोड आहे. आरोपी कशासाठी जन्म प्रमाणपत्र बनवत आहेत, त्यांचा उद्देश काय हा तपासाचा भाग आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झालेले आरोपींना बांगलादेशी सध्यातरी म्हणू शकत नाही, तपासाअंती ते समोर येईल.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.