-
प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगावर टीका केली. त्यांच्या या आरोपांना भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “राहुल गांधी आणि त्यांचे सहयोगी विरोधक तीच तीच कॅसेट पुन्हा वाजवत आहेत. निवडणूक आयोगाने यापूर्वीही या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि यावेळीही आयोग त्यांना समर्पक उत्तर देईल,” असे ते म्हणाले. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत होणारा पराभव स्पष्ट दिसत असल्याने विरोधकांकडून आधीपासूनच फेक नरेटिव्ह पसरवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
(हेही वाचा – बांगलादेशी घुसखोरांना खोटे दाखले बनवून देणारे पोलिसांच्या रडारवर; अकोल्यात Kirit Somaiya तक्रार करणार दाखल)
“विरोधकांची नौटंकी सुरूच” – दरेकरांचा टोला
प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, “महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (मविआ) तीच तीच कॅसेट वाजवली होती. आता राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांना सोबत बसवून तीच कॅसेट पुन्हा वाजवली जात आहे. यावरून विरोधकांचा राजकीय पोरकटपणा दिसून येतो.”
राहुल गांधींना त्यांचा राजकीय सूर सापडत नाही, काँग्रेस पक्षाची वाताहत होत असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी ते त्याच जुन्या आरोपांची पुनरावृत्ती करत आहेत, असे दरेकर (Pravin Darekar) म्हणाले. “जनतेला तुमच्या नौटंकीची सवय झाली आहे. दिल्लीतील पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच विरोधक आताच मानसिक तयारी करत आहेत आणि निवडणुकीच्या आधीच पराभवाचे विश्लेषण करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.”
पुढे बोलताना त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की, “दिल्लीची जनता भाजपाला बहुमत देईल आणि राजधानीच्या विकासासाठी पुन्हा एकदा भाजपाचे सरकार स्थापन होईल.”
(हेही वाचा – मंत्रालय प्रवेशासाठी Facial Recognition प्रणाली अनिवार्य; आमदारांचे स्वीय सहाय्यक अडचणीत)
“शिवसेना उबाठातील नेत्यांच्या गोंधळलेल्या भूमिका”
शिवसेना उबाठाच्या खासदारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर टीका करताना दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, “जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उठाव केला, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर उदय सामंत, गुलाबराव पाटील आणि इतर अनेक नेते होते. मात्र, पुढे त्यांनी बैठक घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शुक्रवारी शिवसेना उबाठाच्या पत्रकार परिषदेत जे नेते उपस्थित होते, ते उद्या पक्ष सोडणार नाहीत, याची खात्री कशी देता येईल?”
“शिवसेना उबाठाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आहेत. बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली, पण आता उद्धव ठाकरे त्याच काँग्रेससोबत हातमिळवणी करत आहेत, हे शिवसैनिकांसाठी अस्वस्थ करणारे आहे,” असे ते म्हणाले.
शिवसेनेच्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघात केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने विकासकामे करायची आहेत. त्यामुळे भविष्यात हे खासदार शिवसेनेसोबत जाऊ शकतात किंवा वेगळा निर्णय घेऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
(हेही वाचा – दिल्लीतील संभाव्य पराभवामुळे राहुल गांधींची रडारड; Chandrashekhar Bawankule यांचे प्रत्युत्तर)
“शिवसेना उबाठा दुरुस्त होत नाही” – अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर पलटवार
शिवसेना उबाठाचे नेते अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, “उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने पूर्वीही शिंदे यांना गृहित धरले आणि त्यांनी संपूर्ण शिवसेना घेऊन गेले, त्याचा त्यांना थांगपत्ताही लागला नाही. आता पुन्हा तशाच स्थितीत आहेत, पण सत्य स्वीकारायला तयार नाहीत.”
“बीड आणि दिल्लीतील निवडणुकीचा काहीच संबंध नाही. त्यामुळे शिवसेना उबाठा संभ्रमित झाली असून त्यांना पुढे काय करावे हे समजत नाही,” अशी टीका त्यांनी केली.
“दिल्लीकर भाजपावर विश्वास ठेवतील”
दिल्लीतील निवडणुकीवर भाष्य करताना दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, “दिल्लीतील जनता पुन्हा भाजपावर विश्वास ठेवेल. आमच्या सरकारने केलेल्या विकासकामांचा आधार घेऊन आम्ही मतदारांचा कौल मिळवू. विरोधक कितीही प्रयत्न करू देत, भाजपाचा विजय निश्चित आहे.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community