काश्मिरी हिंदू (Kashmiri Hindu) विस्थापनानंतरही स्वतःच्या देशात निर्वासित म्हणून राहत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. कलम ३७० आणि ३५ए हटवणे हा महत्त्वाचा निर्णय होता, परंतु आजवर भारत सरकारने विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी कोणतीही योजना घोषित न करणे आश्चर्यकारक आहे. आमची मागणी आहे की, निर्वासित काश्मिरी हिंदूंसाठी जम्मू-काश्मीरमध्ये ‘पनून कश्मीर’ नावाचा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात यावा, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केली.
(हेही वाचा Indians Deportation from US : बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणखी ४८७ भारतीय नागरिकांना अमेरिका करणार हद्दपार)
हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदु मक्कल कच्छी या संघटनांनी शुक्रवार, 7 फेब्रुवारीला पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी चेतन राजहंस बोलत होते. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरू डॉ. चारुदत्त पिंगळे, तामिळनाडूतील ‘हिंदु मक्कल कच्छी’चे संस्थापक अर्जुन संपत आणि हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि ईशान्य भारताचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ उपस्थित होते. काश्मिरी हिंदूंच्या (Kashmiri Hindu) सुरक्षेची आणि पुनर्वसनाची पूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने तत्काळ घ्यावी, असे राजहंस यावेळी म्हणाले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि ईशान्य भारताचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ म्हणाले की, हिंदु जनजागृती समितीने या महाकुंभ क्षेत्रातील सेक्टर ६ मध्ये बांगलादेश आणि काश्मीरमधील हिंदूंवरील अमानवीय अत्याचारांविषयी जनजागृतीसाठी चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे. समाजामध्ये हिंदूंवरील अत्याचारांविषयी जागरूकता निर्माण करणे हे या प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community