Anganewadi Jatra 2025 : आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबई ते सावंतवाडी दरम्यान ४ विशेष गाड्या

96
Anganewadi Jatra 2025 : आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबई ते सावंतवाडी दरम्यान ४ विशेष गाड्या

मध्य रेल्वे आंगणेवाडी जत्रेदरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड दरम्यान ४ विशेष गाड्या चालवणार आहे. (Anganewadi Jatra 2025)

(हेही वाचा – महाराष्ट्रात सोयाबीनची सर्वाधिक खरेदी; पणन मंत्री Jaykumar Rawal यांची माहिती)

तपशील खालीलप्रमाणे आहेत : 

अ) लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड विशेष (२)

ट्रेन क्रमांक 01129 ही विशेष ट्रेन दि. २१.२.२०२५ (शुक्रवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.५५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01130 ही विशेष ट्रेन दि. २१.२.२०२५ (शुक्रवार) रोजी १८.०० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता पोहोचेल.

संरचना : एक प्रथम वातानुकूलित, दोन वातानुकूलित द्वितीय, सहा वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान आणि २ जनरेटर कार. (Anganewadi Jatra 2025)

(हेही वाचा – Bangladesh infiltrators: चेंबूर माहुल गाव येथून 7 अवैध बांगलादेशींना अटक)

ब) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड विशेष (२)

ट्रेन क्रमांक 01131 विशेष ट्रेन दि. २२.२.२०२५ (शनिवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.५५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01132 विशेष ट्रेन दि. २२.२.२०२५ (शनिवार) रोजी १८.०० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता पोहोचेल.

दोन्ही ट्रेनचे थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ. (Anganewadi Jatra 2025)

संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनक्षमता आणि गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

आरक्षण : 01229, 01130, 01131 आणि 01132 या क्रमांकांसाठी विशेष शुल्क आकारून बुकिंग दि. ९.२.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष गाड्यांमध्ये, सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित कोच म्हणून चालवले जातील आणि तिकिटे यूटीएस द्वारे बुक करता येतील.

या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.