![Delhi मध्ये कोणाची सत्ता येणार? दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी केला ५० जागा जिंकण्याचा दावा Delhi मध्ये कोणाची सत्ता येणार? दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी केला ५० जागा जिंकण्याचा दावा](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/Delhi-2-696x377.webp)
दिल्ली विधानसभा निवडणुकीची (Delhi Assembly Election) मजमोजणी दि. ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष चौथ्यांदा सत्तेवर येणार की भाजपा (BJP) राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सरकार स्थापन करणार, हे आज दुपारपर्यंत समजणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीच्या तासांपासून लवकर कल येण्याची शक्यता आहे. दिल्लीत दि. ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले असून ६०.६४ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक आयोगाने (Election Commission) दिली. (Delhi)
( हेही वाचा : BMC Budget 2025-26 : महापालिका अर्थसंकल्पाचा आकडा सात वर्षांनी वाढला तब्बल ५० हजार कोटींनी)
दरम्यान दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा (Virendraa Sachdeva) यांनी आपला पक्ष जवळपास ५० जागा जिंकेल, असा दावा केला आहे. तर दुसरीकडे आपने मतदान चाचण्यांचे अंदाज फेटाळून लावले आहे. त्याचबरोबर आपने अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला आहे. (Delhi)
त्यातच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Election) निकालाच्या एक दिवस आधी दिल्लीत राजकारण तापले. दिल्ली अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने (ACB) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याभोवती फास आवळला आहे. केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी घोडेबाजाराचा आरोप केला आहे, त्यांच्या पक्षाच्या आमदारांना १५ कोटी रुपयांचे आमिष दाखवण्यात आले होते. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.(Delhi)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community