दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) ७० जागांसाठी झालेल्या मतदानानंतर सर्वांचे लक्ष दिल्लीतील निकालाकडे लागलेले आहे. त्यात दिल्लीच्या तिमारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, आप, भाजपा असे तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. यावेळी तिमारपूर विधानसभा मतदारसंघात ‘आप’ने सुरिंदर पाल सिंग बिट्टू (Surinder Pal Singh Bittoo), भाजपाने सूर्यप्रकाश खत्री (Surya Prakash Khatri) आणि काँग्रेसने (Congress) लोकेंद्र चौधरी (Lokendra Chaudhary) यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. २०२० च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे दिलीप पांडे या विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. (Delhi)
( हेही वाचा : Delhi मध्ये कोणाची सत्ता येणार? दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी केला ५० जागा जिंकण्याचा दावा)
पण या मतदारसंघाचे वैशिष्ट्ये म्हणजे तिमारपूर विधानसभेत ज्या पक्षाचा उमेदवार जिंकतो तोच पक्ष सत्तेत येतो, असे बोलले जाते. अनेक निवडणुकांमध्ये असे घडलेले आहे. गेल्या तीन निवडणुकांपासून आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) ही जागा जिंकत आहे. आणि तिन्ही वेळा आप सत्तेत आहे. (Delhi)
तिमारपूरमध्ये १९९३ नंतर भाजपाचा वनवास
तिमारपूर (Timarpur) हा दिल्लीचा विधानसभा मतदारसंघ क्रमांक ३ आहे. तिमारपूर हा ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. १९९३ मध्ये भाजपने ही जागा जिंकली होती आणि तेव्हापासून पक्षाला या जागेवर विजय मिळवता आलेला नाही. काँग्रेसने (Congress) १९९८, २००३ आणि २००८ मध्ये या मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यानंतर आम आदमी पक्षाने २०१३, २०१५ आणि २०२० अशा सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. (Delhi)
तिमारपूरमध्ये कोण आणि कधी जिंकले?
१९९३ राजेंद्र गुप्ता – भाजप
१९९८ जगदीश आनंद – काँग्रेस
२००३ सुरिंदर पाल सिंग (बिट्टू) – काँग्रेस
२००८ सुरिंदर पाल सिंग (बिट्टू) – काँग्रेस
२०१३ हरीश खन्ना – आप
२०१५ पंकज पुष्कर – आप
२०२० दिलीप पांडे – आप
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community