Bangladesh हिंसाचारात आतापर्यंत २३ हिंदूंचा मृत्यू, १५२ मंदिरांवर हल्ले; सरकारने काय म्हटलं?

91
Bangladesh हिंसाचारात आतापर्यंत २३ हिंदूंचा मृत्यू, १५२ मंदिरांवर हल्ले; सरकारने काय म्हटलं?
Bangladesh हिंसाचारात आतापर्यंत २३ हिंदूंचा मृत्यू, १५२ मंदिरांवर हल्ले; सरकारने काय म्हटलं?

बांगलादेशात (Bangladesh) हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल भारत सरकारने बांगलादेशला (Bangladesh) इशारा दिला होता. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचारात हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर कट्टरतावाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांबद्दल जगभरात चिंता व्यक्त करण्यात आली होती. गेल्या वर्षी झालेल्या हिंसक (Bangladesh violence) आंदोलनानंतरही बांगलादेशातील परिस्थिती सुधारलेली नाही. मोहम्मद युनूस (Mohammed Yunus) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या बाबतीत हात वर केले असले तरी गेल्या सहा महिन्यांत बांगलादेश अल्पसंख्याकांसाठी जगणं मुश्किल झालं आहे. (Bangladesh)

हेही वाचा-सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल; राज्यपाल C. P. Radhakrishnan यांचे प्रतिपादन

सत्तांतरानंतरही बांगलादेशात (Bangladesh) हिंदू मंदिरांची तोडफोड आणि हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशी सरकार (Bangladeshi Government) या हल्ल्यांचे दावे फेटाळत आहे. मात्र आता केंद्र सरकारने (The central government) संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात बांगलादेशातील हिंदूंबावत आकडेवारी सादर केली आहे.

हेही वाचा-BMC Budget 2025-26 : महापालिका अर्थसंकल्पाचा आकडा सात वर्षांनी वाढला तब्बल ५० हजार कोटींनी

बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे सरकार उलथून टाकल्यानंतर गेल्या वर्षी सुरू झालेल्या हिंदूविरोधी हिंसाचारात २३ हिंदूंचा मृत्यू झाला असून १५२ हिंदू मंदिरांवर हल्ले आणि तोडफोड करण्यात आल्याचे सरकारने लोकसभेत सांगितले. केंद्र सरकार बांगलादेशातील हिंदूविरोधी हिंसाचारावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि बांगलादेशी सरकारला सतत याबाबत विचारणा केली जात असल्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा-AIDS Jihad : एड्सग्रस्त अब्दुलने हिंदू मुलीचे अपहरण करून केला बलात्कार; याआधी ६ हिंदू मुलींवर केला लैंगिक अत्याचार

बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी ५ ऑगस्टपासून २३ हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. किमान १५२ हिंदू मंदिरांवरही हल्ले झाले आहेत. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी ही माहिती दिली. “गेल्या दोन महिन्यांत बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्याच्या ७६ घटनांची नोंद झाली आहे. गेल्या ऑगस्टपासून २३ हिंदूंचा मृत्यू झाला आहे आणि हिंदू मंदिरांवर हल्ल्यांच्या १५२ घटनांची नोंद झाली आहे,” असं मंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी सांगितले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.