दिल्ली (Delhi) विधानसभा निवडणुकीचे निकाल (Delhi Election Result 2025) जाहीर होत आहेत. 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय राजधानीतील सर्व 70 विधानसभा जागांवर 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. दिल्लीत 60.54 टक्के मतदान झाले होते. (Delhi Election Result 2025)
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर पोस्टल मतमोजणीला (Postal counting) सुरूवात झाली असून पहिला कल हाती आला आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपा (BJP) 25 जागांवर आघाडीवर आहे. (Delhi Election Result 2025)
हेही वाचा-मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीविषयी Uddhav Thackeray यांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले.,.
या निकालाच्या ट्रेंडवरून, पुढील पाच वर्षे कोणाची सत्ता राहणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल. आप (Aap) आणि काँग्रेसने (Congress) सर्व 70 मतदारसंघात उमेदवार उभे केले, तर भाजपने 68 जागा लढवल्या आणि जनता दल (युनायटेड) आणि लोकतांत्रिक जनशक्ती पार्टी (रामविलास) या मित्रपक्षांसाठी दोन जागा सोडल्या. (Delhi Election Result 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community