अवघ्या जगाला पटले आहे कि, कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून झाली आहे. मात्र केवळ धाकदपटशहा करत चीनने याचा कायम अस्वीकार केला आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना असो कि अमेरिका सारखी महासत्ता असो, कुणीही चीनवर असा आरोप केला, तरी चीनचे पित्त खवळते. चीन या आरोपाला इतके घाबरते कि, भारतातील ‘स्वराज्य’ या मासिकाने त्यांच्या अंकात मुखपृष्ठ कथा म्हणून ‘सुपर प्रेडर – चीन’ हे वृत्त छापले, त्याचाही चीनने इतका धसका घेतला आहे कि, चीनने या मासिकावरच बंदी आणल्याचे वृत्त आहे.
आमच्या मासिकाची कायम चीनविरोधी भूमिका असते. त्यामुळे आमच्या अंकामध्ये चीनच्या भूमिकांचे सडेतोड भाषेत खंडण केले जाते. म्हणून चीनने याआधीही आमच्या ऑनलाईन आवृत्तीवर आक्षेप नोंदवले होते. आता चीनने आमच्या ऑनलाईन आवृत्तीवर बंदी आणली आहे.
– आर. जगन्नाथन, संपादक, स्वराज्य मासिक
चीनला झोंबल्या मिरच्या!
भारतातील राष्ट्रवाद जपणारे हे ‘स्वराज्य’ नावाचे मॅगझिन आहे. त्यामध्ये राजकारण, संरक्षण, अर्थकारण, सांस्कृतिक अशा विविध विषयांवरील बातम्यांचा समावेश केला जातो. अशा या मॅगझिनची सोशल मीडियातही विशेष चर्चा सुरु असते. या मॅगझिनमध्ये मुखपृष्ठ कथा म्हणून ‘सुपरस्प्रेडर – चीनला मिळाले संरक्षण, डब्लूएचओ चे होते संगनमत, जगाला समजण्याआधी मानवता आली धोक्यात’ अशा मथळ्याखाली हे सविस्तर वृत्त या मासिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुखपृष्ठावर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे छायाचित्र छापले आहे.
(हेही वाचा : सत्ताधाऱ्यांना खुर्ची बोचायला लागली! फडणवीसांनी सांगितले सरकारचे भवितव्य)
सोशल मीडियावर चीन बनले लक्ष्य!
दरम्यान चीनला या मासिकातील या कथेवर आक्षेप असल्याने चीनने या मासिकावर बंदी आणली आहे. यावर आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. चीनच्या या भूमिकेवर जोरदार टीकाटिपण्णी करण्यात आली आहे. हा चीनचा खोटारडेपणा असून सत्य चीनला बोचत आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियामधून येऊ लागल्या आहेत.
Join Our WhatsApp CommunityLooks like China is unhappy with
Swarajya after this cover. It has banned the magazine. Well, truth hurts.More power to you @SwarajyaMag pic.twitter.com/9KgG2x3TxX
— Smita Barooah (@smitabarooah) July 29, 2021