दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Assembly Election) निकाल आज जाहीर होत आहे. अशातच दिल्ली विधानसभेत आप, काँग्रेस, भाजपा (BJP) कोण आपली सत्ता स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महिलांना अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. त्यातच दिल्ली विधानसभेत (Delhi Assembly Election) पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान जास्त झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दिल्लीत महिला मतदारांचा टक्का वाढल्याने लाडक्या बहिणीचा (Ladki Bahin) कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यात आयोगाच्या आकडेवारीनुसार, निवडणुक निकालाचा कल पाहता, भाजपा (BJP) ५०, आप (Aam Aadmi Party) १९ तर काँग्रेस (Congress) एका जागेवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपाला लाडक्या बहिणींची साथ मिळणार असल्याचा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. (Delhi Election)
( हेही वाचा : Bangladesh हिंसाचारात आतापर्यंत २३ हिंदूंचा मृत्यू, १५२ मंदिरांवर हल्ले; सरकारने काय म्हटलं?)
शहरातील एकूण नोंदणी केलेल्या महिला मतदारांपैकी (७२.३७ लाख) ६०.९२ टक्के महिलांनी मतदान केले आहे तर पुरुषांची संख्या ६०.२१ टक्के इतकी आहे. त्यात निवडणुकीत मतदान करण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढत आहे. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे दिल्लीतील ४६ टक्क्यांपेक्षा जास्त मतदार या महिला आहेत. त्याचबरोबर निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ० मतदारसंघांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे मतदानाचे प्रमाण जास्त होते. यामध्ये दक्षिण, आग्नेय, मध्य, वायव्य आणि नैऋत्य दिल्लीतील अनेक मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीची मते निर्णायक ठरणार, हे निश्चित. त्यात निवडणुक निकालाचा कल पाहता, लाडक्या बहिणींनी (Ladki Bahin)भाजपाला कौल दिल्याचे पाहायला मिळत आहे. पण संपूर्ण चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल. (Delhi Election)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community