Samsung Galaxy Ring Price in India : सॅमसंग गॅलेक्सी रिंगवर या योजनेअंतर्गत मिळतेय १०,००० रुपयांची सूट 

Samsung Galaxy Ring Price in India : एका क्लिकवर आरोग्यविषयक सगळे अपडेट देणारी गॅलेक्सी रिंग 

56
Samsung Galaxy Ring Price in India : सॅमसंग गॅलेक्सी रिंगवर या योजनेअंतर्गत मिळतेय १०,००० रुपयांची सूट 
Samsung Galaxy Ring Price in India : सॅमसंग गॅलेक्सी रिंगवर या योजनेअंतर्गत मिळतेय १०,००० रुपयांची सूट 
  • ऋजुता लुकतुके 

गेल्यावर्षी जून महिन्यात सॅमसंग कंपनीने आपली गॅलेक्सी रिंग पहिल्यांदा जागतिक बाजारात लाँच केली. आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात ती भारतातही उपलब्ध केली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर असलेल्या या रिंग (नावाप्रमाणेच अंगठी) मुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयीचे रिअलटाईम अपडेट मिळू शकतात. सॅमसंग हेल्थ हे कंपनीने त्यासाठी बनवलेलं ॲप या रिंगमध्ये आहे. आणि रिंग तुम्ही अंगठीसारखी कायम बोटात घातलीत तर तुम्ही किती वेळ झोप घेतलीत याचाही अहवाल ही रिंग तुम्हाला देत राहील. (Samsung Galaxy Ring Price in India)

(हेही वाचा- Bangladesh हिंसाचारात आतापर्यंत २३ हिंदूंचा मृत्यू, १५२ मंदिरांवर हल्ले; सरकारने काय म्हटलं?)

या रिंगमध्ये ऑप्टिकल बायो-सिग्नल सेन्सर, तापमापक आणि एक्सेलरोमीटरही आहेत. त्यामुळे ती परिधान केलेल्यांना शरीरातील ऊर्जा पातळी, ऑक्सिजन पातळी आणि बरोबरच तुमच्या ह्रदयाचं आरोग्यही झटक्यात समजू शकेल. शिवाय यात अनियमित चढ उतार झाले तर तसंही ही रिंग तुम्हाला सूचित करेल. बोटांच्या वेगवेगळ्या मापांनुसार २ ते ७ अशा आकारात ही रिंग उपलब्ध असेल. आणि तिचं कमीत कमी वजन २.३ ग्रॅम तर जास्तीत जास्त वजन ३ ग्रॅम आहे. एकदा चार्ज केल्यावर ही रिंग सात दिवस काम करेल असा कंपनीचा दावा आहे. (Samsung Galaxy Ring Price in India)

 गोल्ड, सिल्व्हर आणि टायटॅनिअम अशा तीन रंगांत ही रिंग उपलब्ध असेल. पाणी, धूळ यांपासून या रिंगला कुठलाही धोका नाही. सुरुवातीला कंपनीने ३८,९९९ रुपयांना ही रिंग लाँच केली आहे. आणि यावर सॅमसंगकडून ईएमआय योजनाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पण, नवीन वर्षांत कंपनीने एक स्मार्ट ऑफर जारी करून या रिंगच्या खरेदीसाठी १०,००० रुपयांची विशेष सवलत उपलब्ध केली आहे. (Samsung Galaxy Ring Price in India)

(हेही वाचा- Delhi Election मध्ये लाडक्या बहिणींची मते ठरली निर्णायक; भाजपाची ५० जागांवर आघाडी)

कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून ही रिंग तुम्ही खरेदी केलीत तर तिथे किंमत ३८,९९९ अशीच लिहिलेली असेल. पण, कुपन कोड ‘GALAXYRING’ असं सलग लिहिलंत तर तुम्हाला थेट १०,००० रुपयांची सूट लागू होईल. त्यामुळे तुम्हाला गॅलेक्सी रिंग २८,९९९ रुपयांना पडेल. ही कुपन योजना सध्या नीट सुरू आहे. ही रिंग अर्थातच, तुमच्या सॅमसंग फोनलाही जोडता येते. आणि फोनवर लावलेला गजर तसंच इतर काही फिचर तुम्ही या रिंगमधूनही ऑपरेट करू शकता. (Samsung Galaxy Ring Price in India)

सॅमसंगने आपले फोल्डेबल फोन बाजारात आणले तेव्हाच ही रिंग लाँच केली. पण, सध्या बाजारात बोट स्मार्ट रिंग (२,९९९ रु) आणि पेबल आयरिस (५,९९९ रु) असे काही स्वस्तातील पर्यायही उपलब्ध आहेत.  (Samsung Galaxy Ring Price in India)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.