-
ऋजुता लुकतुके
जागतिक दर्जाचा अस्सल भारतीय फॉर्मल कपड्यांचा ब्रँड म्हणून ठळक नाव समोर येतं ते पीटर इंग्लंडचं. नावावरून हा ब्रँड भारतीय असेल असं सुरुवातीला खरंही वाटत नाही. पण, मूळचा आयरिश असलेला हा ब्रँड २००० साली कुमार मंगलम बिर्ला यांनी आदित्य बिर्ला फॅशनच्या पंखांखाली घेतला. आणि तिथूनच या ब्रँडचा आंतरराष्ट्रीय विस्तार झाला आहे. आता पुरुषांच्या फॉर्मल, कॅज्युअल तसंच अगदी एथनिक फॅशनमध्येही कंपनीने आता आपला जम बसवला आहे. २०१४ साली ही कंपनी भारतातील सगळ्यात मोठी फॅशन कंपनी बनली आहे. त्यावर्षी कंपनीचा विक्रीचा आकडा देशात सर्वाधिक म्हणजे १० लाख इतका होता. (Peter England)
१८८९ साली या ब्रँडची स्थापना आयर्लंडमध्ये झाली होती. बोअर युद्धाच्या काळात इंग्लिश संघाचे कपडे या कंपनीने शिवले होते. तेव्हा स्टायलिश कपड्यांसाठी ही कंपनी प्रसिद्ध होती. लंडनडेरी काऊंटीत असलेल्या एका कारखान्यात कंपनीचे शर्ट बनत होते. आणि त्यासाठी कापसाचा पुरवठा अर्थातच भारतातून होत होता. कोट्स वियेला ही या ब्रँडची मालक कंपनी होती. पण, हळू हळू १९९२ मध्ये ही कंपनी बंद झाली. आणि त्यामुळे या भागातील शेकडो लोकांचा रोजगार केला. (Peter England)
तोपर्यंत भारतीय बाजारपेठेत तयार शर्टांची मागणी वाढत होती. ब्रँडेड तयार शर्टची इथं चलती होती. अशावेळी १९९७ मध्ये हा डबघाईला आलेला ब्रँड भारतात एक निकराचा प्रयत्न म्हणून लाँच झाला. पण, तो खऱ्या अर्थाने चर्चेत आला जेव्हा २००० साली कुमार मंगलम बिर्ला यांनी आपल्या पंखाखाली घेतला. आदित्य बिर्ला फॅशनचा भाग झाल्यानंतर हा ब्रँड पुन्हा एकदा आणि खऱ्या अर्थाने जागतिक झाला. (Peter England)
(हेही वाचा- Delhi Election मध्ये लाडक्या बहिणींची मते ठरली निर्णायक; भाजपाची ५० जागांवर आघाडी)
शर्टच्या निर्मितीत आधुनिक बदल, रुबाबदार फॉर्मल लुक, विविध रंगांचा वापर आणि टिकवलेला दर्जा यामुळे अजूनही पीटर इंग्लंड हा देशातील पहिल्या १० ब्रँडपैकी एक ब्रँड आहे. पीटर इंग्लंड कंपनीची ६४० आऊटलेट्स भारतात आहेत. आणि कंपनीचा भारताबाहेर आशियाई आणि युरोपीयन बाजारपेठेतही शिरकाव केला आहे. (Peter England)
त्याचबरोबर अलीकडेच कंपनीने आयुषमान खुराणा आणि करण जोहरबरोबर कंपनीने लग्न समारंभाचे एथनिक कपडेही लाँच केले आहेत. कापड आणि शिवणीचा उत्कृष्ट दर्जा आणि मध्यम श्रेणीतील किंमत असं या ब्रँडचं वैशिष्ट्य मानलं जातं. (Peter England)