सनातन श्रद्धेच्या भव्य उत्सवात, महाकुंभात (Mahakumbh 2025) , जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पवित्र संगमात पवित्र स्नान करण्यासाठी प्रयागराजला (Prayagraj) येत आहेत. महाकुंभमध्ये आतापर्यंत सुमारे ४० कोटी भाविकांनी संगम स्नान केले आहे. सनातन श्रद्धेचे बंधन इतके खोल आहे की, महाकुंभमेळ्यादरम्यान (Mahakumbh 2025) पवित्र संगमात स्नान करण्यासाठी पाकिस्तानातील (Pakistan) हिंदू (Pakistani Hindu) बांधवही पवित्र स्नानासाठी पोहोचले आहेत.
पाकिस्तानातील भाविक त्यांच्या पूर्वजांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी विशेष व्हिसा घेऊन प्रयागराजला आले होते. पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब प्रांतातील ६८ हिंदू भाविकांचा समूह प्रयागराज येथे आला आहे. महाकुंभाची (Mahakumbh 2025) व्यवस्था आणि भव्यता पाहून सर्व पाकिस्तानी भाविक भारावून गेले होते. भक्तांसोबत आलेल्या रामनाथजींनी सांगितले की, यापूर्वी सर्वजण हरिद्वारला (Haridwar) गेले होते. तेथे त्यांनी सुमारे ४८० पूर्वजांच्या अस्थिकलशांचे विसर्जन केल व त्यांच्या आत्माला सद्गती प्राप्त होण्यासाठी प्रार्थना केली. (Mahakumbh 2025)
पाकिस्तानातून आलेले भाविक म्हणतात की, “सनातनच्या श्रद्धेचा धागा आणि महाकुंभात स्नान करण्याच्या इच्छेने त्यांना येथे खेचून आणले. त्यांची अनेक वर्षांची ही इच्छा होती, पण त्यांच्या पूर्वजांचीही अशी आशा होती की त्यांनी कुंभमेळ्यात सहभागी होऊन त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करावे. सनातन आस्थेच्या दिव्य आणि भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल भारत सरकार (Government of India) आणि उत्तर प्रदेश सरकारचे (Government of Uttar Pradesh) आभार.” (Mahakumbh 2025)
हेही वाचा-Bangladesh हिंसाचारात आतापर्यंत २३ हिंदूंचा मृत्यू, १५२ मंदिरांवर हल्ले; सरकारने काय म्हटलं?
भाविकांचे म्हणणे आहे की, महाकुंभाची व्यवस्था खूप चांगली आहे, येथील वातावरण, येथील जेवण, स्वच्छता व्यवस्था, सर्व काही कौतुकास्पद आहे. पाकिस्तानमध्ये आम्हाला मंदिरात जाण्याची परवानगीही नव्हती, इथे येऊन आम्हाला केवळ आशीर्वाद मिळाला नाही तर आमच्या पालकांना आणि पूर्वजांनाही मोक्ष मिळाला आहे. त्यांनी सांगितले की, लहानपणापासूनच त्यांनी प्रयागराज आणि संगम या पवित्र भूमीबद्दल ऐकले होते, गंगा मातेमध्ये स्नान करून त्यांचे जीवन यशस्वी झाले आहे. (Mahakumbh 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community