Champions Trophy 2025 : अखेर लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअमचं उद्धाटन संपन्न, लखलखत्या फ्लडलाईट्समध्ये उजळून निघालं गद्दाफी 

61
Champions Trophy 2025 : अखेर लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअमचं उद्धाटन संपन्न, लखलखत्या फ्लडलाईट्समध्ये उजळून निघालं गद्दाफी 
  • ऋजुता लुकतुके 

चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानच्या सज्जतेवर उलट सुलट चर्चा रंगली असताना अखेर पाकिस्तानने स्पर्धेसाठीचं एक स्टेडिअम तरी वापरासाठी खुलं केलं आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअमचं नुतनीकरण पूर्ण झालं असून शुक्रवारी पाक पंतप्रधान शहीन शरिफ यांच्या हस्ते त्याचं उद्गाटन करण्यात आलं. लाहोर, कराची आणि रावळपिंडी अशा तीन ठिकाणी चॅम्पियन्स करंडकातील सामने होणार आहेत आणि स्पर्धेसाठी तयार असलेलं हे एकमेव स्टेडिअम आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Anganewadi Jatra 2025 : आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबई ते सावंतवाडी दरम्यान ४ विशेष गाड्या)

११७ दिवसांच्या नुतनीकरणाच्या कामानंतर गद्दाफी स्टेडिअम आयोजनासाठी सज्ज झालं असून तिथे नवीन एलईडी दिवे, इलेक्ट्रॉनिक गुणफलक, प्रेक्षकांसाठी नवीन गॅलरी आणि अद्ययावत ड्रेसिंग रुम उभारण्यात आल्या आहेत. प्रेक्षक क्षमताही आता वाढली आहे. तर मैदानात कॉर्पोरेट बॉक्सही बसवण्यात आले आहेत. (Champions Trophy 2025)

 १,००० च्या वर कामगारांनी मागचे ४ महिने या स्टेडिअममध्ये काम केलं आहे. आता शनिवारी लगेचच या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड हा आंतरारष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर हे स्टेडिअम चॅम्पियनस करंडकाच्या आयोजनासाठी आयसीसीकडे सोपवण्यात येईल. १९ फेब्रुवारीपासून स्पर्धा सुरू होत असून भारताच्या सामन्यांखेरित इतर सर्व सामने हे पाकिस्तानातच होणार आहेत. (Champions Trophy 2025)

 पाकिस्तानमध्ये यापूर्वी १९९६ ची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा पार पडली होती. त्यानंतर होणारी ही पहिली आयसीसी स्पर्धा आहे. २००९ मध्ये लाहोरमध्येच श्रीलंकन संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं जिकिरीचं झालं. त्यानंतर सुरक्षेच्या पूर्ण बंदोबस्तांत अलीकडे इथं सामने भरवले जातात. चॅम्पियन्स करंडकाचं यजमानपद मिळाल्यावर पाकिस्तानने देशातील तीन स्टेडिअमचं नुतनीकरणाचं काम हातात घेतलं होतं. पण, हे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे आयसीसीची नाराजीही ओढवून घेतली. अखेर वाढीव मुदतीत तीनही स्टेडिअम पूर्ण होणार असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. पुढील आठवड्यात कराची आणि रावळपिंडीतील स्टेडिअमही खुली होणार आहेत. (Champions Trophy 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.