Manish Sisodia आणि केजरीवाल पराभूत; ‘आप’ला भाजपाचा जोरदार धक्का

93
Manish Sisodia आणि केजरीवाल पराभूत; 'आप'ला भाजपाचा जोरदार धक्का
Manish Sisodia आणि केजरीवाल पराभूत; 'आप'ला भाजपाचा जोरदार धक्का

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते मनिष सिसोदीया यांचा पराभव झाला आहे. जंगपुरा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे तरविंदर सिंग मारवाह आणि ‘आप’चे मनिष सिसोदीया (Manish Sisodia ) अशी लढत झाली होती. या लढतीत मनिष सिसोदीया (Manish Sisodia ) यांना जोरदार धक्का बसला असून ६७५ मतांनी त्यांचा पराभव झाला आहे. सिसोदीयांना ३८ हजार १८४ आणि तरविंदर सिंग मारवाह यांना ३८ हजार ८५९ मते मिळाली आहे. (Aam Aadmi Party )

( हेही वाचा : दिल्लीच्या निकालावर Chitra Wagh यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक; ट्विट करत म्हणाल्या …

मनीष सिसोदिया यांचा भाजपचे तरविंदर सिंग मारवाह (Tarvinder Singh Marwah) यांनी पराभव केला आहे. दारू घोटाळ्यात अटक झाल्यानंतर जामिनावर सुटलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पटपडगंजची जागा सोडून जंगपुरा येथून निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पक्षाचे विद्यामान आमदार प्रवीण कुमार (Praveen Kumar) यांचे तिकीट कापण्यात आले होते. पण सिसोदीयांना जंगपुराचा गड राखता आला नाही.

दरम्यान ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या परवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा पराभव केला आहे. दिल्ली विधानसभेच्या (Delhi Assembly) ७० जागांचा निकाल दि. ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होत आहे. त्यात ‘आप’ ला जोरदार धक्का बसला आहे कारण ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि मनिष सिसोदीया (Manish Sisodia) यांचा पराभव झाला आहे. तसेच आपच्या या ही पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. (Aam Aadmi Party ) अरविंद केजरीवाल यांचा ३ हजार १८२ मतांनी पराभूत झाले आहेत.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.