IPL 2025 : साईराज बहुतुले राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक

IPL 2025 : सध्या बहुतुले राष्ट्रीय क्रिकेट अकादमीशी संलग्न आहे.

56
IPL 2025 : साईराज बहुतुले राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक
  • ऋजुता लुकतुके

माजी भारतीय फिरकी गोलंदाज साईराज बहुतुले (Sairaj Bahutule) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्समध्ये सामील होणार आहे. तो संघाचा फिरकी प्रशिक्षक असेल. सध्या बहुतुले बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीशी संलग्न आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली बहुतुलेनी भारतीय संघाचे फिरकी सल्लागार म्हणून काम केले. २०१८ ते २०२१ च्या आयपीएल हंगामात तो रॉयल्सचा फिरकी प्रशिक्षक होता. बहुतुले १९९७ मध्ये भारतीय संघातून २ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळला आहे. (IPL 2025)

राजस्थान संघात साईराज न्यूझीलंडचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँडसोबत काम करताना दिसणार आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत. “माझी राजस्थान रॉयल्सबरोबर चर्चा सुरू आहे,” बहुतुले (Sairaj Bahutule) यांनी शुक्रवारी क्रिकबझला सांगितले. मी फ्रँचायझीसोबत करार करण्याच्या अगदी जवळ आहे. काही ठिकाणी अजूनही काही काम करायचे आहे. रॉयल्ससोबत परत येण्यास उत्सुक आहे. राहुलसोबत काम करणे नेहमीच आनंददायी राहिले आहे. २०२३ मध्ये झालेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत, जेव्हा मी फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होतो, तेव्हा राहुलनेच मला भारतीय संघाशी जोडले होते. मी श्रीलंकेत त्याच्या कोचिंग स्टाफचाही भाग होतो. (IPL 2025)

(हेही वाचा – Ind vs Eng, 2nd ODI : जसप्रीत बुमराहच्या दुखापतीचा अहवाल शनिवारी मिळणार? चॅम्पियन्स करंडकातील सहभागावर लवकरच निर्णय)

५२ वर्षीय बहुतुले (Sairaj Bahutule) यांनी भारतासाठी २ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो वर्षभर रॉयल्समध्ये सामील होणाऱ्या नवीन गोलंदाजांना प्रशिक्षण देईल. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात राजस्थानने इंग्लंडचे जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, आकाश माधवाल आणि फजलहक फारुकी यांना खरेदी केले होते. संघात श्रीलंकेचे फिरकीपटू महेश थीकशन, वानिंदू हसरंगा आणि कुमार कार्तिकेय यांचा समावेश आहे. (IPL 2025)

दरम्यान राजस्थान रॉयल्स फ्रँचाईजीही भारताबाहेर विस्ताराच्या प्रयत्नांत आहे. अध्यक्ष मनोज बदाले यांनीही तसं सुतोवाच केलं आहे. कॅरेबियन प्रिमिअर लीग आणि एसए२० मध्ये त्यांचा प्रत्येकी एक संघ आहे. आता द हंड्रेड लीगमध्येही संघ खरेदीसाठी बदाले उत्सुक असल्याचं समजतंय. एट हंड्रेड लीग संघांपैकी सहा संघ विकले गेले आहेत. सदर्न ब्रेव्हज आणि रॉकेट्स हे २ संघ शिल्लक आहेत आणि त्यांच्यासाठी सोमवारी बोली लागणार आहे. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.