दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. विधानसभा निवडणुकीची ही पाचवी वेळ आहे की, काँग्रेसने दिल्लीत शून्याची हॅट्रिक केली आहे. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत ० जागा, २०१९ लोकसभा निवडणुकीत ० जागा, २०२० विधानसभा निवडणुकीत ० जागा, लोकसभा निवडणुकीत ० जागा आणि आता २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसकडे पाच शून्य आहेत. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Repo Rate Cut : रेपोरेट कपातीनंतर तुमचा हफ्ता किती रुपयांनी कमी होणार?)
आतापर्यंत हाती आलेल्या निवडणुकीच्या कलानुसार, दिल्लीच्या ७० जागांमध्ये काँग्रेसला एकाही जागेवर खाते उघडता आले नाही. मतदानाच्या टक्केवारीचा विचार केला तर काँग्रेस अत्यंत वाईट स्थित असल्याचे दिसत आहे. सकाळी १०.३० वाजता मिळालेल्या माहितीनुसारस, काँग्रेसला ६.८६ टक्के मते मिळाली आहेत. दुपारी २. १५ पर्यंतच्या माहितीनुसार, ७० जागांपैकी भाजपा ४८ जागांवर आणि आप २२ जागांवर आघाडीवर आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसला एकही जागेवर आघाडी किंवा विजय मिळवता आला नाही. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Ind vs Eng, 2nd ODI : जसप्रीत बुमराहच्या दुखापतीचा अहवाल शनिवारी मिळणार? चॅम्पियन्स करंडकातील सहभागावर लवकरच निर्णय)
काँग्रेस नेत्यांनी मौन बाळगले
जेव्हा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना दिल्ली निवडणुकीच्या निकालांबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांनी अद्याप निकाल पाहिलेला नाही, असे सांगितले. यावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते निकालांबद्दल किती गंभीर आहेत हे दिसून येते. तथापि, विरोधी पक्षनेते राहुल गांधी किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (Delhi Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community