Arvind Kejriwal यांनी पराभव केला मान्य; भाजपाला दिल्या शुभेच्छा!

132

दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election Results 2025) आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, जनतेचा निर्णय आम्हाला मान्य असून, या विजयाबद्दल भाजपाचे अभिनंदन करतो. असे विधान व्हिडीओच्या माध्यमातून केले.  (Arvind Kejriwal)

केजरीवाल यांनी एका व्हिडिओच्या (Arvind Kejriwal Video) माध्यमातून म्हटले आहे की, दिल्ली निवडणुकीचे (Delhi Election) निकाल शनिवार, ०८ फेब्रुवारी रोजी जाहीर होत आहेत. जनतेचा निर्णय काहीही असो, आम्ही तो पूर्ण नम्रतेने स्वीकारतो. जनतेचा निर्णय आमचा आहे. भाजपाच्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

तसेच ते पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत जनतेने दिलेल्या संधीमध्ये आम्ही बरेच काम केले आहे. शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी या क्षेत्रात बरेच काम झाले आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारे लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीच्या पायाभूत सुविधा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.

(हेही वाचा – Repo Rate Cut : रेपोरेट कपातीनंतर तुमचा हफ्ता किती रुपयांनी कमी होणार?)

आम्ही सत्तेसाठी राजकारणात प्रवेश केलेला नसून, लोकांच्या सुख-दुःखात आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत राहू, असे केजरीवाल म्हणाले. आम्ही राजकारणाला जनतेची सेवा करण्याचे माध्यम मानतो. आम्ही केवळ एका मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर समाजसेवाही करत राहू. आपल्याला अशा प्रकारे लोकांच्या सुखात आणि दुःखात मदत करावी लागेल.

(हेही वाचा – Delhi Assembly Election : दिल्लीमध्ये काँग्रेसची शून्याची हॅट्रिक)

तसेच मी आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी निवडणूक उत्तम प्रकारे लढवली. आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या काळात त्यांनी खूप काही सहन केले पण या संपूर्ण निवडणुकीत त्यांनी उत्तम कामगिरी केली. याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.