The Leela Mumbai : लीला पॅलेस, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्ससाठी मुंबई ठरली Lucky; आता आहेत भारतभर शाखा

50
The Leela Mumbai : लीला पॅलेस, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्ससाठी मुंबई ठरली Lucky; आता आहेत भारतभर शाखा

लीला पॅलेस हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स ही एक भारतीय लक्झरी हॉटेल्सची चेन आहे. १९८६ साली ही हॉटेल्सची चेन सी. पी. कृष्णन नायर यांनी सुरू केली होती. सध्या ही ब्रुकफील्ड अ‍ॅसेट यांच्या मॅनेजमेंटच्या मालकीची आहे.

लीला पॅलेस हॉटेल्सचा इतिहास

लीला पॅलेस, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सची स्थापना द लीला ग्रुपचा एक भाग म्हणून करण्यात आली होती. लीला हॉटेल्स चेनचं नाव हे त्याचे संस्थापक सी. पी. कृष्णन नायर यांच्या पत्नीच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. कॅप्टन नायर यांनी १९८६ साली मुंबईतल्या सहार व्हिलेज इथे त्यांच्या घराजवळ ११ एकर जमीन खरेदी केली आणि त्यांचं पहिलं हॉटेल ‘द लीला, मुंबई’ हे बांधलं. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळचं हे पहिलं लक्झरी हॉटेल होतं.

या हॉटेल्स चेनचं मुख्यालय मुंबई येथे आहे. द लीला पॅलेसेस, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स ब्रुकफील्ड अ‍ॅसेट मॅनेजमेंट-प्रायोजित खाजगी रिअल इस्टेट फंडाच्या मालकीचं आहे. एवढंच नाही तर भारतातल्या प्रमुख शहरांत आणि रिलॅक्सेशन झोनमध्ये बारा पुरस्कार विजेते हॉटेल्स ही मॅनेजमेंट कंपनी चालवते. त्यांत नवी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, उदयपूर, जयपूर, गुरुग्राम, पूर्व दिल्ली, मुंबई, गांधीनगर, कोवलम आणि अष्टमुडी या प्रमुख हॉटेल्सचा समावेश आहे. (The Leela Mumbai)

(हेही वाचा – Ind vs Eng, 2nd ODI : जसप्रीत बुमराहच्या दुखापतीचा अहवाल शनिवारी मिळणार? चॅम्पियन्स करंडकातील सहभागावर लवकरच निर्णय)

२००१ साली या ग्रुपचं पहिलं आधुनिक हॉटेल हे भारताची आयटी राजधानी असलेलं बंगळुरू येथे बांधलं गेलं. या हॉटेलमध्ये ३५७ खोल्या आहेत. हे हॉटेल म्हैसूर पॅलेस आणि १३ व्या शतकातल्या विजयनगर साम्राज्याच्या स्थापत्यकलेपासून प्रेरित आहे. तसंच सात एकर एवढ्या बागांनी वेढलेलं आहे. २००९ सालापर्यंत लीला हॉटेल्सच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी दोन मालमत्ता जोडल्या गेल्या. त्या म्हणजे ‘द लीला पॅलेस’, उदयपूर (राजस्थान) आणि ‘द लीला अँबियन्स, गुडगाव होय.

‘लीला अँबियन्स, गुडगाव’ हॉटेल अँड रेसिडेन्सेस ही लीला ग्रुपची अँड मॅनेजमेंटची पहिली अशी मालमत्ता आहे, जी त्यांच्या मालकीची नाही. ‘लीला पॅलेस, नवी दिल्ली’ हे हॉटेलमध्ये एप्रिल २०११ साली सुरू करण्यात आलं होतं. हे हॉटेल दिल्ली इथल्या सर एडविन लुटियन्सपासून प्रेरित होऊन बांधण्यात आहे. पुढे लीला ग्रुप्सने २०१३ साली चेन्नई येथे ‘द लीला पॅलेस, चेन्नई’ नावाचं एक नवीन हॉटेल सुरू केलं. (The Leela Mumbai)

(हेही वाचा – Delhi Assembly Election : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला दिल्लीत जबरदस्त धक्का)

त्यानंतर दुसरं मॅनेज्ड हॉटेल २०१५ साली पूर्व दिल्ली येथे ‘द लीला अँबियन्स कन्व्हेन्शन’ हॉटेल ताब्यात घेण्यात आलं. पुढे २०२१ साली या ग्रुपने तीन नवीन हॉटेल्स बांधून आपला पोर्टफोलिओ आणखी मजबूत केला. ते हॉटेल्स म्हणजे ‘द लीला पॅलेस, जयपूर’, ‘द लीला, गांधीनगर’ आणि ‘द लीला भारतीय सिटी, बंगळुरू’ होय. तसाच पुढे हैदराबाद, सिक्कीम आणि आग्रा येथेही नवीन हॉटेल्स उघडण्याची योजना सुरू आहे.

लीला ब्रँडची यूएस-आधारित प्रीफर्ड हॉटेल्स अँड रिसॉर्ट्ससोबत मार्केटिंग युती आहे. एवढंच नाही तर ते दुबई-आधारित ग्लोबल हॉटेल अलायन्सचे सदस्यही आहेत. स्विस-आधारित केम्पिंस्कीसोबत असलेली पूर्वीची मार्केटिंग युती ही ऑक्टोबर २०१३ साली संपली. (The Leela Mumbai)

(हेही वाचा – Ind vs Eng, 2nd ODI : ‘विराट कोहली कटकमध्ये खेळणार’ – शुभमन गिल )

ऑक्टोबर २०१९ साली झालेल्या करारामध्ये या कंपनीने नवी दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, उदयपूर इथले हॉटेल्स मालमत्ता आणि ऑपरेशन्स हे कॅनडा-आधारित ब्रुकफील्ड अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीला ३,९५० कोटी रुपयांचा करार करून विकल्या. त्यामुळे ब्रुकफील्डचा भारताच्या हॉस्पिटॅलिटी मार्केटमध्ये प्रवेश झाला.

पुढे बँकांच्या ग्रुप्सच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या विक्रीच्या व्यवहारामध्ये निधीचा गैरवापर झाल्याचे कारण देत आयटीसी ग्रुपने लीला हॉटेल्सच्या विक्रीवर आक्षेप घेतला होता. या विक्री व्यवहारामध्ये अल्पसंख्याक भागधारकांचं हित दुर्लक्षित करण्यात आलं होतं. तसंच इच्छुक बोलीदारांनी सादर केलेल्या इतर बोली मुंबईतील मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी जेएम फायनान्शियलने विचारात घेतल्या नव्हत्या. सप्टेंबर २०१९ साली सिक्युरिटीज अपीलीय न्यायाधिकरणाने आयटीसीची याचिका फेटाळून लावली त्यामुळे ब्रुकफिल्डला हॉटेल्स ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला. (The Leela Mumbai)

(हेही वाचा – visvesvaraya national institute of technology : नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये किती शुल्क आकारलं जातं?)

आयटीसी व्यतिरिक्त लीला हॉटेल्स अँड रिसॉर्ट्ससाठी इतर दावेदारही होते. ज्यामध्ये संयुक्त अरब अमिरातीचा व्यापारी रशीद अल-हबतूर याचाही समावेश होता. तसंच शस्त्रास्त्र विक्रेता अभिषेक वर्मा यांनीही जानेवारी २०१९ साली ६०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची बोली सादर केली होती. पण त्या दोघांच्याही बोली स्वीकारल्या गेल्या नाहीत. म्हणून या विक्री व्यवहारामध्ये जेएम फायनान्शियलच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

लीला पॅलेसची व्यवसाय रचना

लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स हे लीला पॅलेस अँड रिसॉर्ट्स लिमिटेडचे व्यावसायिक नाव आहे. हॉटेल लीलाव्हेंचर लिमिटेड, ही हॉटेल ग्रुपची शेवटची होल्डिंग कंपनी आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE: 500193 आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच NSE: HLVLTD वर याचा व्यापार केला जातो. ‘हॉटेल लीलाव्हेंचर लिमिटेड’ स्वतः लीला ग्रुपच्या बिझनेस ग्रुपचा भाग आहे. (The Leela Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.