दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे (Delhi Election Result) कल स्पष्ट होताच दिल्लीतील उपराज्यपालांनी लागलीच दिल्ली सचिवालयाला सील ठोकण्याचा आदेश दिला आहे. आम आदमी पक्षांनी १० वर्षांत काय काय उद्योग केले, त्याची एकही फाईल बाहेर जाता कामा नये, यासाठी हे आदेश देण्यात आले.
(हेही वाचा दिल्लीत भाजपाच्या दणदणीत विजयानंतर PM Narendra Modi यांनी काय दिली हमी ? वाचा…)
उपराज्यपालांनी सचिवालय सील करण्याचे आदेश देत दिल्ली सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाचारण केले आहे. व्ही के सक्सेना यांच्या निर्देशानंतर दिल्लीच्या सामान्य प्रशासन विभागाने याचा आदेश काढला. भाजपाने ३० जागा जिंकल्यानंतर सक्सेना यांनी तत्काळ हे आदेश दिले. सामान्य प्रशासन विभागाच्या परवानगीशिवाय कोणतीही फाइल, कागदपत्रे, संगणक हार्डवेअर इत्यादी दिल्ली सचिवालयाच्या बाहेर जाऊ शकत नाही. तसेच, सर्व विभाग, एजन्सी आणि मंत्री परिषदेच्या कॅम्प ऑफिसना विभागाच्या परवानगीशिवाय कोणतेही रेकॉर्ड किंवा फाइल्स हटवू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. (Delhi Election Result)
Join Our WhatsApp Community