Delhi to Prayagraj Flight : महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजच्या तिकिटांचे दर गगनाला भिडले

Delhi to Prayagraj Flight : अलीकडे दरात थोडी कपात झाली असली तरी यात्रेकरूंना ते परवडणारे नाहीत.

59
Delhi to Prayagraj Flight : महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजच्या तिकिटांचे दर गगनाला भिडले
  • ऋजुता लुकतुके

महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंना यंदा महाग तिकीट दरांचा सामना करावा लागत आहे. आता फेब्रुवारी महिन्यातील पहिला आठवडा पार पडला आहे आणि कुंभमेळा २६ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. पण, तरीही तिकीट दर थोडेच कमी झाले आहेत. इक्जिगो वेबसाईटवरील आकडेवारी पाहिली तर आताही दिल्ली ते प्रयागराज असे तिकिटांचे दर हे १३,५०० रुपये ते २५,००० रुपयांच्या दरम्यान आहेत. (Delhi to Prayagraj Flight)

(हेही वाचा – Delhi Election Result : दिल्लीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होताच सचिवालय केले सील; ‘आप’ चे ‘उद्योग’ झाले बंदिस्त )

पण, तरीही गेल्यावर्षी याच कालावधीतील दरांच्या तुलनेत हे दर ८० ते ९० टक्क्यांनी जास्त आहेत. केंद्रीय नागरी उड्डायण मंत्रालयाच्या वेबसाईटवरही दर तपासले असता ९० टक्क्यांची वाढ झालेलं दिसेल. सध्या प्रयागराज इथं महाकुंभमेळा सुरू आहे. १३ जानेवारीला सुरू झालेला हा मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या कालावधीत प्रयाग इथं येऊन गंगेत स्नान केल्यास तुमची सर्व पापं धुवून निघतात अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी इथं होते. अगदी लाखोंच्या संख्येत रोज इथं लोक गंगा स्नानासाठी येतात. (Delhi to Prayagraj Flight)

(हेही वाचा – Delhi Assembly Election : दिल्लीत आप आणि काँग्रेसच्या पराभवाची काय आहेत कारणे?)

त्यामुळे यंदा विमानाचे तिकीट दरही गगनाला भिडले आहेत. ‘प्रयागराजला येणाऱ्या विमानांचे दर नेहमीच्या तुलनेत ५ पटीने वाढले आहेत. आम्ही विमान कंपन्यांशी नियमितपणे संपर्कात आहोत. त्यांना दर आटोक्यात राखण्याची विनंती आम्ही केली आहे. पण, एका मर्यादेपर्यंत हे दर कमी होऊ शकतात. ते नियमित होण्याची शक्यता कमीच आहे,’ असं प्रयागराज विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष मुकेशचंद्र उपाध्याय पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले आहेत. (Delhi to Prayagraj Flight)

(हेही वाचा – भाजपाच्या विजयावर मुख्यमंत्री Yogi Adityanath यांचे विधान; म्हणाले, “दिल्लीत खोटेपणा आणि लुटीच्या राजकारणाला पूर्णविराम”)

New Project 2025 02 08T190207.356

प्रयागराज विमानतळावर सध्या दिवसभरात २५ ते २५ विमान उतरत आहेत. याशिवाय खाजगी जेट आणि व्हीव्हीआयपी उड्डाणंही नियमितपणे होत आहेत. ‘आतापर्यंत कुंभमेळ्याच्या पहिल्या महिन्यात प्रयागराजला १ लाखांच्यावर लोक विमानाने आले आहेत. एका दिवसांत ५,०००च्या वर पर्यटक संख्या या विमानतळाने पहिल्यांदा अनुभवली. अशा गर्दीत विमान तिकीटं कमी करणं तसं अवघडच आहे,’ असं मुकेश उपाध्याय म्हणाले. (Delhi to Prayagraj Flight)

विमान कंपन्यांनी आपल्या फेऱ्याही वाढवल्या आहेत. पण, अजूनही तिकिटांच्या किमती आटोक्यात आलेल्या नाहीत. ज्या पर्यटकांनी १५ दिवस आधी तिकिटं काढली आहेत, त्यांना मुंबई ते प्रयागराज तिकीट १२,५०० रुपये, दिल्ली ते प्रयागराज तिकीट ८,२०० रुपये आणि बंगळुरू ते प्रयागराज तिकीट १७,५०० रुपये सरासरी पडत आहे. हेच तिकीट जर ७ दिवस आधी काढलं तर तिकिटाचे दर २०० टक्के जास्त आहेत. हिंदू जनतेसाठी कुंभमेळा हा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि यंदा या मेळ्यासाठी ४५० दशलक्ष भारतीय आणि १५ लाख परदेशी नागरिक इथं येतील असा अंदाज आहे. (Delhi to Prayagraj Flight)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.