-
प्रतिनिधी
निवडणुकीपूर्वी लागू केलेल्या लाडकी बहीण योजना यथास्थित राहणार असून कोणतेही नवीन निकष लावलेले नाहीत. त्यामुळे ज्या महिलांना आधीपासून ठरवलेल्या निकषांनुसार लाभ मिळत होता, त्यांनाच तो पुढेही मिळेल. मात्र, अपात्र लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही महिलांचे आतापर्यंत योजनेअंतर्गत मिळालेले पैसे सरकार परत घेणार नाही आणि भविष्यातही अशी कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र, योजना सुरळीत चालावी आणि खरोखर गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचावा, यासाठी पडताळणी सुरू आहे.
(हेही वाचा – अरविंद केजरीवालांच्या नौटंकीची दिल्लीच्या जनतेकडून चिरफाड; Pravin Darekar यांचा प्रहार)
लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीमुळे संभ्रम
डिसेंबर २०२४ पर्यंत लाडकी बहीण योजना अंतर्गत सुमारे २ कोटी ४६ लाख महिला लाभार्थी होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेची सत्यता तपासण्याचे काम हाती घेण्यात आले. यामुळे काही महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, सरकार मिळालेला निधी परत घेणार असल्याची अफवा पसरली. या भीतीपोटी सुमारे पाच लाख महिलांनी योजनेतून माघार घेतली आहे. विरोधकांनी या विषयावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi जाणार १२, १३ फेब्रुवारीला अमेरिका दौऱ्यावर)
फडणवीसांचा खुलासा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, योजनेच्या घोषणेनंतर ठरवलेले निकष कायम आहेत आणि नवीन निकष लागू करण्यात आलेले नाहीत. मात्र, पूर्वी ठरवलेल्या निकषांना न बसणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई केली जात आहे. सरकारचा हेतू गरजू महिलांनाच लाभ मिळावा, हा आहे.
“लाडकी बहीण योजना” लाभ घेणाऱ्या काही महिलांनी स्वतःहून लाभ सोडला आहे, ही समाधानाची बाब आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नमूद केले.
(हेही वाचा – दिल्ली विधानसभा निकालानंतर भाजपाच्या Chitra Wagh यांची संजय राऊतांवर बोचरी टीका; म्हणाले, स्वयंघोषित संपादक…)
जनतेच्या पैशाचे संरक्षण अनिवार्य – फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, जनतेच्या पैशाचा गैरवापर होऊ नये म्हणून सरकार जबाबदार आहे. केंद्र सरकारचा महालेखा नियंत्रक (CGA) सरकारच्या वित्तीय व्यवहारांवर नजर ठेवतो. जर कोणत्याही अपात्र व्यक्तींना लाभ दिला जात असेल, तर सीजीए त्यावर आक्षेप घेईल. म्हणूनच योजना निकषांनुसार योग्य लाभार्थ्यांनाच मिळेल, अपात्र लाभार्थ्यांचा फायदा बंद केला जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
लाडकी बहीण योजनेत कोणताही नवीन बदल किंवा कठोर अट लावली नसली, तरी अपात्र लाभार्थ्यांना योजनेपासून दूर ठेवण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिलांनी मिळालेले पैसे सरकार परत घेणार नसल्याची ग्वाही देऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी योजनेसंदर्भातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community