दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections 2025) भाजपाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी शनिवार, 08 फेब्रुवारी रोजी भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात यमुना मैया की जय या घोषणेसह केली. तसेच अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दिल्लीच्या जनतेने नाकारलं आहे, तसेच काँग्रेसला (Congress) दिल्लीकरांनी जागा दाखवली आहे असं म्हणत काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे. (PM Narendra Modi)
सभेतील जनतेला संबोधित करताना नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, दिल्लीला आप पक्षापासून मुक्त केल्याने विजयाचा आणि शांततेचा उत्साह जनतेमध्ये दिसत आहे. तुम्ही खुल्या मनाने प्रेम दिले. मी दिल्लीच्या लोकांना सलाम करतो. असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच दिल्लीत भाजपाला 27 वर्षांनंतर स्पष्ट बहुमत मिळाले. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी भाजपाने 48 आणि आम आदमी पक्षाला 22 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे.
(हेही वाचा – दिल्लीत भाजपाचे यश हे दिल्लीकरांकडून PM Modi यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; DCM Ajit Pawar यांचा दावा)
काँग्रेसविषयी काय म्हणाले नरेंद्र मोदी?
“जनतेने काँग्रेसला कठोर संदेश दिला आहे. दिल्लीतल्या निवडणुकीत काँग्रेसने शून्याची हॅटट्रीक लावली आहे. देशाच्या राजधानीत सर्वात जुन्या पक्षाचा सलग सहावेळा पराभव झाला आहे. त्यांना खातंही उघडता आलेलं नाही. काँग्रेसवर कुणाचाही विश्वास उरलेला नाही. मी मागच्या वेळी म्हटलं होतं काँग्रेस हा परजिवी पक्ष झाला आहे. हा पक्ष स्वतःही डुबतो आणि सहकारी पक्षांना डुबवतो. काँग्रेस पक्ष आपल्या सहकाऱ्यांना संपवणारा पक्ष आहे.”
सहकारी पक्षांची भाषा, अजेंडा चोरण्याचं काम काँग्रेसकडून होतं आहे-मोदी
आत्ताची काँग्रेस सहकारी पक्षांची भाषा, त्यांचा अजेंडा चोरण्यात अनुभवी आहे. त्यांचे मुद्दे चोरायचे आणि मग त्यांची व्होटबँक चोरायची. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आणि बसपा यांचे मुद्दे चोरुन त्यांची व्होट बँक ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. तामिळनाडूमध्ये डीएमकेची भाषा काँग्रेस पक्ष आणखी जोरात बोलते आहे. कारण काँग्रेसला तिथे स्वतःची जागा बनवायची आहे. बिहारमध्येही जातीयवादाचं विष पसरवण्याचं काम काँग्रेसने केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सहकाऱ्यांची अशीच अवस्था काँग्रेस केली आहे. दिल्लीतही हे स्पष्ट झालं आहे की जो काँग्रेसचा हात धरतो तो बुडतोच हे निश्चित असतं. असं मोदी सभेत म्हणाले आहेत.
(हेही वाचा – Hindu Temple : हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू; Minister Nitesh Rane यांचे आश्वासन)
ती काँग्रेस आता नाही…
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या काळात जी काँग्रेस होती ती आज नाही. काँग्रेस देशहिताची नाही तर अर्बन नक्षल्यांची (Urban Naxalism) चिंता आहे. त्यांच्यासाठी राजकारण काँग्रेस करत आहे. काँग्रेसचे नेते म्हणतात, भारताशी लढतोय. इंडियन स्टेटसची लढत आहे. ही नक्षलवाद्यांची भाषा आहे. समाज आणि देशात अराजकता निर्माण करणारी भाषा आहे. असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community