UK’s Royal Navy तील महिला आता दिसणार साडीमध्ये; ड्रेस कोडमध्ये केला समावेश

80

‘रॉयल नेव्ही रेस डायव्हर्सिटी नेटवर्क’ (Royal Navy Race Diversity Network, आर.डी.एन्.) चे अध्यक्ष लान्स कॉर्पोरल जॅक कनानी यांनी सामाजिक माध्यमावर भारतियांसाठी एक आनंदाची बातमी प्रसारित केली आहे. ‘ब्रिटीश रॉयल नेव्ही’ने (UK’s Royal Navy) त्यांच्या महिला अधिकार्‍यांसाठी औपचारिक ‘ड्रेस कोड’मध्ये साडी, सलवार कमीज आणि लेहेंगा समाविष्ट केले आहेत. ब्रिटीश नौदलाने त्याचा पोशाख अधिक समावेशक बनवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या नवीन ‘ड्रेस कोड’च्या अंतर्गत महिला अधिकारी आता कोणत्याही औपचारिक कार्यक्रमात ‘जॅकेट’खाली साडीसह सांस्कृतिक पोशाख नेसू शकतात.

(हेही वाचा – Kumbh Mela 2025 : ‘अतुल्य भारत’ संकल्पनेतून नाशिक कुंभमेळा टपाल तिकिटास मंजुरी)

या पोस्टसोबत त्यांनी एक छायाचित्रही प्रसारित केले आहे, ज्यामध्ये कॅप्टन दुर्दाना अन्सारी जॅकेटखाली साडी नेसलेल्या दिसत आहेत. महिलांना साडीवर ‘ब्लॅक बो’ आणि पांढरा शर्ट देखील घालावा लागेल.

कनानी यांनी सांगितले की, धोरणात सुधारणा करण्यापूर्वी महिलांचे मत विचारण्यात आले होते. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि म्हटले की, यामुळे अधिकार्‍यांना त्यांची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख टिकवून ठेवत सेवा देता येणार आहे. (UK’s Royal Navy)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.