Accident News : बीडमध्ये भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडकली ; डॉक्टर बहीण-भाऊ ठार

90
Accident News : बीडमध्ये भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडकली ; डॉक्टर बहीण-भाऊ ठार
Accident News : बीडमध्ये भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडकली ; डॉक्टर बहीण-भाऊ ठार

नुकताच विवाह पार पडल्यानंतर नववधु-वरांसमवेत जेजुरी (Jejuri) येथे खंडेरायांचे दर्शन घेऊन परत येत असताना बीड (Beed) जिल्ह्यातील अहमदपूर (Ahmedpur) ते अहिल्यानगर (Ahilyanagar) या राष्ट्रीय महामार्गारील पुलाला कार धडकल्याने भीषण अपघात (Accident News) झाला. यात मानवत तालुक्यातील वझुर बु.येथील डॉक्टर बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. (Accident News)

हेही वाचा-सर्व औषधांची नवीन नियमावलीप्रमाणे गुणवत्ता तपासणी करा, मगच वापरा; Prakash Abitkar यांचे निर्देश

डॉ. ओम ज्ञानोबा चव्हाण व त्यांची चुलत बहिण डॉ. मृणाली शिंदे अशी मृतांची नावे आहेत. (Accident News) मानवत तालुक्यातील वझुर गावातील निवृत्त प्रा.माणिक चव्हाण हे सध्या पालम येथे राहतात. त्यांचा मुलगा डॉ. मंथन चव्हाण हे सोनपेठ येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. दि. 2 जानेवारीला डॉ. मंथन याचे सातोना येथील मुलीशी विवाह पार पडला. हे नवदांम्पत्य यात्रा म्हणून देवदर्शनासाठी कानसूर येथील त्यांची बहीण डॉ.मृणाली शिंदे व वझुर येथील त्यांचा चुलत भाऊ डॉ.ओम चव्हाण असे चारजण कारने (एम.एच.22, ए.एम.4571) जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी गेलेले होते. (Accident News)

हेही वाचा-आत्मनिर्भरतेतून लष्कराचे स्वदेशीकरण शक्य; भारतीय वायूसेनेचे एअर मार्शल Vijay Kumar Garg यांचे प्रतिपादन

तेथून ते परतीच्या प्रवासात सोनपेठकडे येण्यासाठी निघाले होते. दरम्यान, अहमदपूर ते अहमदनगर महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यानच्या मुळकवाडी येथील पुलाला कार धडकल्याने झाला. या अपघातात डॉ.ओम चव्हाण व डॉ.मृणाली शिंदे हे दोघे डॉक्टर बहीण – भाऊ जागीच ठार झाले. तर कारमधील नवदांम्पत्यातील डॉ.मंथन चव्हाण व त्यांची पत्नी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Accident News)

हेही वाचा-UK’s Royal Navy तील महिला आता दिसणार साडीमध्ये; ड्रेस कोडमध्ये केला समावेश

या अपघातामुळे मानवत तालुक्यातील वझुर व पाथरी तालुक्यातील कानसुर या दोन गावावर शोककळा पसरली. डॉ.ओम चव्हाण यांच्या पार्थिवावर वझुर येथे तर डॉ.मृणाली शिंदे यांच्यावर कानसूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (Accident News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.