सत्ताधाऱ्यांनी उपविधीतील सूचविलेल्या दुरुस्त्या फेटाळात नाही तर त्यांच्या पाच संचालकांविरोधातील अविश्वास प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्यावर विरोधकांनी थेट वार केला आहे. त्यांच्या एका याचिकेवर विभागीय सहनिबंधकांनी अध्यक्ष बच्चू कडू यांना संचालक पदावरून अपात्र करण्याबाबत नोटिस बजाविल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात (Cooperative Department) खळबळ उडाली आहे. (Bachu Kadu)
जिल्हा मध्यवर्ती बँकेची (Amravati District Bank) सत्ता बच्चु कडू (Bachu Kadu) यांनी काबीज केल्यानंतर माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या गटाने सत्ताधाऱ्यांविरोधात तक्रारींचा सपाटा सुरू केला. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या अनेक महत्वांच्या निर्णयांविरोधात विभागीय सहनिबंधकांसह सहकारमंत्री ते उच्च न्यायालयापर्यंतचा प्रवास या गटाने सुरू केला आहे. मागील महिन्यात सत्ताधऱ्यांनी सूचविलेल्या उपविधीतील दुरुस्त्यावर बबलू देशमुख गटाने आक्षेप घेतल्यानंतर त्या फेटाळण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-सर्व औषधांची नवीन नियमावलीप्रमाणे गुणवत्ता तपासणी करा, मगच वापरा; Prakash Abitkar यांचे निर्देश
त्यानंतर लगेच सत्ताधारी गटातील पाच संचालकांविरोधात अविश्वास प्रस्तावाला न्यायालयाने हिरवा झेंडा दिल्याने विभागीय सहनिबधंकांनी येत्या १४ फेब्रुवारीला अविश्वास ठरावाकरिता विशेष सभा बोलावली आहे. याच दरम्यान बबलू देशमुख (Bablu Deshmukh) गटातील संचालक हरीभाऊ मोहोड (Haribhau Mohod) यांच्यासह ११ संचालकांनी बॅकेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachu Kadu) यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका दाखल केली.
हेही वाचा-…तेव्हा काश्मिरी पंडितांनी असाहाय्यतेचे अश्रू ढाळले; आपच्या पराभवाविषयी Anupam Kher काय म्हणतात ?
नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात एका वर्षाची शिक्षा ठोठावल्याचा दाखला त्यांनी यामध्ये दिला होता. बँकेच्या उपविधीत एक वर्षापेक्षा अधिक शिक्षा लागलेले संचालक हे या पदाकरिता अपात्र ठरतात, अशी उपविधीत तरतुद असल्याने या नियमांचा आधार घेत विभागीय सहनिबंधकांनी, आपणाला अपात्र का करण्यात येऊ नये, तसेच पुढील पाच वर्षांकरिता आपणास सदरचे पद धारण करण्यास अपात्र का करू नये, अशी नोटिस बँक अध्यक्ष बच्चू कडू (Bachu Kadu) यांना बजावली आहे.
नोटिसमध्ये काय ?
याकरिता त्यांना तोंडी म्हणणे मांडावयाचे असल्यास २४ फेब्रुवारी, रोजी दुपारी ३ वाजता साक्ष नोंदविण्याकरिता समक्ष अथवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहून म्हणणे सादर करावे. आवश्यक पुराव्यासह मुदतीत समाधानकारक खुलासा सादर न केल्यास अथवा सुनावणीस अनुपस्थित राहिल्यास प्रस्तुत प्रकरणी काहीही म्हणावयाचे नाही, असे ग्राह्य धरून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे नोटिसमध्ये नमुद करण्यात आले आहे. (Bachu Kadu)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community