देशात बनत आहे जगातील सर्वाधिक इंजिनक्षमता असलेली Hydrogen Fuel train

73

भारतीय रेल्वे (Indian Railways) देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन (Hydrogen Fuel Train) विकसित करण्याच्या दिशेने दमदार पावले उचलत आहे. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित केली जात आहे. या ट्रेनसाठी डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (DEMU) रेकवर हायड्रोजन इंधन पेशींचे रेट्रोफिटिंग केले जात आहे. रेल्वे रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनने या ट्रेनच्या तांत्रिक स्पेसिफिकेशन्स तयार केली आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी राज्यसभेत दिली.

(हेही वाचा – Accident News : बीडमध्ये भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडकली ; डॉक्टर बहीण-भाऊ ठार)

हायड्रोजन ट्रेन केवळ लांबी आणि ताकदीच्या बाबतीतच नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या प्रगत पातळीवरही जगात अव्वल ठरेल, असा विश्वास वैष्णव यांनी या वेळी व्यक्त केला.

हायड्रोजन रिफिलिंगसाठी एकात्मिक हायड्रोजन उत्पादन-साठवण-वितरण सुविधा विकसित केली जाणार आहे. यासाठी पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना (PESO) कडून आवश्यक मंजुरी घेण्यात येत आहे.

जगातील फक्त चार देश हायड्रोजन-इंधनयुक्त इंजिन बनवतात. हे देश 500 ते 600 हॉर्सपॉवर दरम्यान इंजिन तयार करतात, तर भारतीय रेल्वेने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या इंजिनची क्षमता 1200 हॉर्सपॉवर आहे, जी या श्रेणीतील आतापर्यंतची सर्वाधिक आहे. या इंजिनचे उत्पादन काम पूर्ण झाले असून सिस्टम इंटिग्रेशनचं काम सुरू आहे. हे इंजिन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे.

या इंजिनची पहिली चाचणी हरियाणातील (Haryana) जिंद-सोनीपत मार्गावर होईल. 89 किमी लांबीच्या या मार्गावर हायड्रोजन ट्रेनची चाचणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाने 2023-24 या आर्थिक वर्षात 35 हायड्रोजन फ्युएल सेल ट्रेन विकसित करण्यासाठी 2800 कोटी रुपयांच्या बजेटचे वाटप केले आहे. (Hydrogen Fuel train)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.