इथून पुढे ‘त्या’ लाडक्या बहि‍णींना योजनेचा लाभ घेता येणार नाही; CM Devendra Fadnavis यांनी केलं स्पष्ट

163
इथून पुढे 'त्या' लाडक्या बहि‍णींना योजनेचा लाभ घेता येणार नाही; CM Devendra Fadnavis यांनी केलं स्पष्ट

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाभदायक ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेबाबत (CM Devendra Fadnavis) एक मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसताही लाभ घेतलेल्या महिलांकडून पैशांची वसुली करणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आम्ही जनतेच्या पैशांचे रक्षक
“लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) कुठलेही नवीन निकष नाहीत. आम्ही स्वत:हून कोणाचेही पैसे परत घेतलेले नाही. हे पैसे परत मागणार सुद्धा नाहीत. पण नियमाच्या बाहेर जाऊन कोणाला फायदा पोहोचत असेल तर तो बंद करण्यात येणार आहे. आम्ही जनतेच्या पैशांचे रक्षक आहोत.” असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. (CM Devendra Fadnavis)

अपात्र महिलांना लाभ घेता येणार नाही
लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) अपात्र महिलांना इथून पुढे योजनेचा लाभ घेता येणार नाही. काही बहिणींनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आणि हे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वत:हून योजनेचा लाभ घेणे बंद केले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनेच्या नियमात ज्या महिला बसत नाहीत, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलं आहे. (CM Devendra Fadnavis)

पाच लाख महिला अपात्र
शासनाच्या स्क्रुटीनीनुसार आत्तापर्यंत 5 लाख महिला या योजनेत अपात्र ठरल्या आहेत. त्यामध्ये 2 लाख 30 हजार महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या (Sanjay Gandhi baseless Yojana) लाभार्थी आहेत. एक लाख 10 हजार महिला वय वर्षे 65 पेक्षा जास्त आहेत. तर, महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी, नमोशक्ती (Namo Shakti Yojana) योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या एकूण महिला एक लाख 60 हजार आहेत, अशा एकूण पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.