दिल्लीच्या CM Atishi यांनी दिला राजीनामा; मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपाची बैठक

CM Atishi resigns : उपराज्यपालांनी ७ वी दिल्ली विधानसभा (Delhi Legislative Assembly) विसर्जित करण्याची अधिसूचना जारी केली

64

दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Election Result 2025) आपचा (Aam Aadmi Party) दारूण पराभव झाला आहे. निकालांच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी (CM Atishi) यांनी उपराज्यपालांकडे पदाचा राजीनामा सोपवला. अतिशी सकाळी ११ वाजता उपराज्यपालांच्या सचिवालयात पोहोचल्या. जिथे त्यांनी एलजी व्हीके सक्सेना यांच्याकडे पदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर उपराज्यपालांनी ७ वी दिल्ली विधानसभा (Delhi Legislative Assembly) विसर्जित करण्याची अधिसूचना जारी केली.

(हेही वाचा – करजगी येथील अत्याचाराच्या प्रकरणी फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणार; Rupali Chakankar यांचे आश्वासन)

दिल्लीत, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी १७ सप्टेंबर २०२४ रोजी उपराज्यपाल (एलजी) विनय सक्सेना यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला. त्यांच्यासोबत आतिशी आणि ४ मंत्री उपस्थित होते. यानंतर, आतिशी यांनी नवीन सरकार स्थापनेचा दावा केला होता.

कालकाजी मतदारसंघात आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधुरी यांचा ३,५८० मतांनी पराभव केला. तथापि, त्यांच्या दिल्लीत सत्तेत असलेल्या आपला २२ जागांवर समाधान मानावे लागले. ७० पैकी ४८ जागा जिंकून भाजपा २६ वर्षांनी दिल्लीच्या सत्तेत परतला, तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.